IND vs NZ, 2nd ODI Live : बँग ऑन! मोहम्मद शमीने भन्नाट गोलंदाजी करताना दिले दोन धक्के, सिराजला १ विकेट, Video

India vs New Zealand, 2nd ODI Live : भारताने पहिल्या वन डे सामन्यात रोमहर्षक विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 02:03 PM2023-01-21T14:03:49+5:302023-01-21T14:06:40+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 2nd ODI Live :  What a start! Perfect from Mohammed Shami to remove Finn Allen in just the first over, Mohammad Siraj strikes now - India have picked 3 in the powerplay, Video  | IND vs NZ, 2nd ODI Live : बँग ऑन! मोहम्मद शमीने भन्नाट गोलंदाजी करताना दिले दोन धक्के, सिराजला १ विकेट, Video

IND vs NZ, 2nd ODI Live : बँग ऑन! मोहम्मद शमीने भन्नाट गोलंदाजी करताना दिले दोन धक्के, सिराजला १ विकेट, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 2nd ODI Live : भारताने पहिल्या वन डे सामन्यात रोमहर्षक विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. शुभमन गिलच्या द्विशतकाने पहिला सामना गाजवला,  त्यानंतर न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलने अखेरपर्यंत किल्ला लढवला. अवघ्या १२ धावांनी न्यूझीलंडचा संघ हरला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघात कोणताच बदल केला नाही. न्यूझीलंडच्या संघातही कोणताच बदल झालेला नाही. रोहित शर्माचा मजेशीर प्रसंगानंतर मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) पहिल्याच षटकात कमाल करून दाखवली. 

नाणेफेक जिंकल्यावर एक मजेशीर प्रसंग घडला... १३ सेकंद रोहित ब्लँक झाला.. . नेमका काय निर्णय घ्यावा हेच त्याला सूचेना झालं... रोहित काय म्हणाला, ''काय निर्णय घ्यायचाय हेच मी काही काळासाठी विसरलो होतो. नाणेफेक जिंकल्यावर काय निर्णय घ्यायचा याबाबत संघासोबत बरीच चर्चा झाली होती. आम्हाला आव्हानात्मक परिस्थितीसाठी तयार राहायचे आहे. त्यामुळे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतो.'' टीम इंडियाने २०१० पासून घरच्या मैदानावर २५ मालिका खेळल्या आहेत. ज्यामध्ये २२ मालिकांमध्ये यश मिळवले आहे, तर केवळ तीन वेळा अपयश आले आहे.  

मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर किवींना धक्का दिला. पहिले चार चेंडू वेगवेगळ्या शैलीचे फेकल्यानंतर शमीने पाचवा चेंडू भन्नाट वळवला अन् फिन अ‌ॅलनला काही कळण्याआधी यष्टिंवर आदळला. किवींना शून्य धावांवर पहिला धक्का बसला. वन डे क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावरील शमीची ५० वी विकेट ठरली अन् अशी कामगिरी करणारा तो भारताचा १५ वा गोलंदाज ठरला. मोहम्मद सिराजने सहाव्या षटकात किवींना दुसरा धक्का देताना हेन्री निकोल्सला ( २) माघारी पाठवले. पुढच्याच षटकात शमीने स्वतःच्याच गोलंदाजीवर रिटर्न झेल घेताना डॅरिल मिचेलची विकेट घेतली. 



 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IND vs NZ, 2nd ODI Live :  What a start! Perfect from Mohammed Shami to remove Finn Allen in just the first over, Mohammad Siraj strikes now - India have picked 3 in the powerplay, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.