Join us  

IND vs NZ, 2nd ODI : संघात स्थान न मिळालेल्या Sanju Samson ने ग्राऊंड स्टाफला केली मदत; कृतीने जिंकले सर्वांचे मन, Video  

IND vs NZ, 2nd ODI : संजू सॅमसन ( Sanju Samson) याला पुन्हा एकदा एक मॅच खेळवून बाकावर बसवले गेले. संतुलित संघ निवडण्यासाठी अष्टपैलू खेळाडू असावा यासाठी संजूचा बळी दिला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 11:54 AM

Open in App

IND vs NZ, 2nd ODI : संजू सॅमसन ( Sanju Samson) याला पुन्हा एकदा एक मॅच खेळवून बाकावर बसवले गेले. संतुलित संघ निवडण्यासाठी अष्टपैलू खेळाडू असावा यासाठी संजूचा बळी दिला गेला. अपयशी ठरणाऱ्या रिषभ पंतला पुन्हा संधी दिली. संघ व्यवस्थापनाच्या या वागणुकीने चाहते नाराज झाले आहेत आणि ते BCCI ला ट्रोल करत आहेत. संजूचे फॅन्सही मोठ्या संख्येने मैदानावर उपस्थित दिसत आहेत. संजूला न खेळवल्याने तेही निराश आहेत. पण, संजू या गोष्टीचा फार विचार करत नाही. मिळालेल्या संधीवर १०० टक्के द्यायचे हेच त्याला माहितीय... आज पावसाने या सामन्यात खोळंबा घातला आणि त्या काळात संजू ग्राऊंड स्टाफला खेळपट्टीवर कव्हर्स टाकण्यात मदत करताना दिसला. 

मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाची धडपड सुरू आहे. पहिल्या वन डे सामन्यात ३००+ धावा करूनही न्यूझीलंडने कर्णधार केन विलियम्सन व टॉम लॅथम यांच्या विक्रमी २२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर विजय मिळवला. त्यामुळेच भारतीय संघाने आजच्या सामन्यात दोन महत्त्वाचे बदल केला. पण, त्यांनी पुन्हा एकदा संजू सॅमसनला बाकावर बसवले. शिखर धवन व शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण, पावसाच्या बॅटिंगमुळे जवळपास चार-साडेचार तास सामना थांबवावा लागला. भारतीय वेळेनुसार ११.१० मिनिटांनी सामना सुरू झाला.

अष्टपैलू दीपक हुडा आणि दीपक चहर यांना संधी देताना सॅमसन व शार्दूल ठाकूर यांना आज वगळले. शिखर धवन व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला पुन्हा सकारात्मक सुरूवात करून दिली. या दोघांनी ४.५ षटकांत २२ धावा फलकावर चढवल्या अन् जोरदार पाऊस सुरू झाला.  ११ वाजता पाहणी झाली. त्यानंतर २९-२९ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय झाला आहे. भारताचे ओपनर मैदानावर पुन्हा आले आणि धवन आल्यासारखा माघारीही परतला. मॅट हेन्रीने भारताला धक्का देताना धवनची ( ३) विकेट काढली. षटक संख्या कमी झाल्यामुळे सूर्यकुमार यादवला पुढे पाठवले गेले आणि त्याने २५ चेंडूंत ३४ धावा चोपल्या आहेत.  गिल ४५ धावांवर खेळतोय आणि १२.५ षटकांत भारताच्या १ बाद ८९ धावा झाल्या असताना पुन्हा पाऊस आला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडसंजू सॅमसनशिखर धवन
Open in App