Join us  

IND vs NZ, 2nd ODI : पावसामुळे दुसरा वन डे सामना रद्द करावा लागला; भारताला ICC Rankings मध्ये फटका बसला

चार तासानंतर पाऊस थांबला आणि सामना काही काळ सुरू झाला. पण, पुन्हा पावसाने एन्ट्री घेतली आणि अखेर 12.30 वाजता मॅच रद्द होत असल्याची घोषणा झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 12:39 PM

Open in App

IND vs NZ, 2nd ODI :  मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाची धडपड सुरू आहे.  भारतीय संघाने आजच्या सामन्यात दोन महत्त्वाचे बदल केले आहेत.अष्टपैलू दीपक हुडा आणि दीपक चहर यांना संधी देताना सॅमसन व शार्दूल ठाकूर यांना आज वगळले. शिखर धवन व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला पुन्हा सकारात्मक सुरूवात करून दिली. या दोघांनी ४.५ षटकांत २२ धावा फलकावर चढवल्या अन् जोरदार पाऊस सुरू झाला. चार तासानंतर पाऊस थांबला आणि सामना काही काळ सुरू झाला. पण, पुन्हा पावसाने एन्ट्री घेतली आणि अखेर 12.30 वाजता मॅच रद्द होत असल्याची घोषणा झाली.

 संघात स्थान न मिळालेल्या Sanju Samson ने ग्राऊंड स्टाफला केली मदत; कृतीने जिंकले सर्वांचे मन, Video  

तत्पूर्वी, ११ वाजता पाहणी झाली आणि  त्यानंतर २९-२९ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय झाला आहे. भारताचे ओपनर मैदानावर पुन्हा आले आणि धवन आल्यासारखा माघारीही परतला. मॅट हेन्रीने भारताला धक्का देताना धवनची ( ३) विकेट काढली. षटक संख्या कमी झाल्यामुळे सूर्यकुमार यादवला पुढे पाठवले गेले आणि त्याने २५ चेंडूंत ३४ धावा चोपल्या आहेत.  गिल ४५ धावांवर खेळतोय आणि १२.५ षटकांत भारताच्या १ बाद ८९ धावा झाल्या असताना पुन्हा पाऊस आला.  न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे ११२ रेटिंग गुण होते आणि ते तिसऱ्या क्रमांकावर होते. ऑस्ट्रेलियाच्या खात्यातही ११२ रेटिंग गुण होते. पण, न्यूझीलंडविरुद्ध पहिली वन डे गमावल्यानंतर भारताचे रेटिंग गुण कमी झाले आणि ते चौथ्या क्रमांकावर सरकले. भारतीय संघ ११० रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आला आहे. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या क्रमांकावर पकड मजबूत केली आहे.  त्यात आता दुसरा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे भारताला आणखी फटका बसण्याची शक्यता आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडपाऊसबीसीसीआय
Open in App