India vs New Zealand, 2nd T20I Live : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरा ट्वेंटी-२० सामना लखनौमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला २१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) 'यंग ब्रिगेड'ला आजचा सामना जिंकून मालिका वाचवण्याचे आव्हान आहे. पहिल्या सामन्यात आघाडीची फळी अपयशी ठरली होती आणि अर्शदीप सिंगची गोलंदाजी ही संघासाठी चिंतेची बाब ठरली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात हार्दिक प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणता बदल करतो, याची उत्सुकता आहे.
शुभमन गिल, इशान किशन आणि राहुल त्रिपाठी हे आघाडीचे फलंदाज १५ धावांत माघारी परतल्यानं भारतीय संघ पहिल्या ट्वेंटी-२० त अडचणीत सापडला होता. गोलंदाजीत अर्शदीपने मार खाल्ला.. त्यामुळे हार्दिक आजच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करेल, अशी अपेक्षा आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
भारतीय संघ- शुभमन गिल, इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs NZ, 2nd T20I Live : New Zealand have won the toss and they've decided to bat first, Yuzvendra Chahal in for Umran Malik. Still no place for Prithvi Shaw
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.