India vs New Zealand, 2nd T20I Live Updates : भारतीय संघ मालिका विजयाच्या निर्धारानं मैदानावर उतरला आहे. कर्णधार रोहित शर्मानं ( Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जयपूर सामन्यात भारतानं विजय मिळवून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात मोहम्मद सिराजला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली, तर IPL 2021मधील पर्पल कॅप विजेत्या हर्षल पटेलनं ( Harshal Patel) पदार्पण केलं. या पदार्पणात हर्षलनं राहुल द्रविड व सचिन तेंडुलकर यांच्या पंक्तित स्थान पटकावलं.
आयपीएल २०२१त ३२ विकेट्स घेऊन इतिहास रचणाऱ्या हर्षल पटेलला ( Harshal Patel) यानं आजच्या सामन्यातून पदार्पण केलं. भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकर याच्या हस्ते हर्षलला टीम इंडियाची कॅप दिली गेली. आयपीएलच्या एकाच पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा हर्षल पटेल हा सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला. त्यानं जसप्रीत बुमराहनं मागील पर्वात नोंदवलेला २७ विकेट्सचा विक्रम मोडला. भुवनेश्वर कुमारनं ( SRH) २०१७मध्ये २६ , जयदेव उनाडकटनं २०१७ मध्ये ( RPS) २४ व हरभजन सिंग २०१३मध्ये ( MI) २४ विकेट्स घेतल्या होत्या. पहिल्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या मोहम्मद सिराजच्या जागी त्याला संधी मिळाली आहे.
भारताकडून ट्वेंटी-२०त पदार्पण करणारा हर्षल पटेल हा सहावा वयस्कर खेळाडू ठरला. राहुल द्रविडनं ३८ वर्ष व २३२ दिवसांचा असताना ट्वेंटी-२०त पदार्पण केलं होतं. त्यानंतर सचिन तेंडुलकर ( ३३ वर्ष व २२१ दिवस), श्रीनाथ अरविंद ( ३१ वर्ष व १७७ दिवस), स्टुअर्ट बिन्नी ( ३१ वर्ष व ४४ दिवस), मुरली विजय ( ३१ वर्ष व ३९ दिवस) आणि हर्षल पटेल ( ३० वर्ष व ३६१ दिवस) असा क्रमांक येतो.
Web Title: IND vs NZ, 2nd T20I Live Updates : Harshal Patel become a sixth oldest T20I debutants for India, MD Siraj got a web split on his left hand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.