IND vs NZ, 2nd T20I Live Updates : 'Purple' cap ते 'National' cap; टीम इंडियानं दुसऱ्या सामन्यात तगडा गोलंदाज मैदानावर उतरवला

India vs New Zealand, 2nd T20I Live Updates : भारतीय संघानं पहिली ट्वेंटी-२० जिंकून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 06:33 PM2021-11-19T18:33:27+5:302021-11-19T18:37:11+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 2nd T20I Live Updates : Harshal Patel makes his T20I debut for India, India won the toss and decided to bowl first | IND vs NZ, 2nd T20I Live Updates : 'Purple' cap ते 'National' cap; टीम इंडियानं दुसऱ्या सामन्यात तगडा गोलंदाज मैदानावर उतरवला

IND vs NZ, 2nd T20I Live Updates : 'Purple' cap ते 'National' cap; टीम इंडियानं दुसऱ्या सामन्यात तगडा गोलंदाज मैदानावर उतरवला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 2nd T20I Live Updates : भारतीय संघानं पहिली ट्वेंटी-२० जिंकून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. सोपा वाटणारा सामना टीम इंडियानं अवघड बनवला अन् अखेरच्या षटकापर्यंत विजयासाठी संघर्ष करावा लागला. ही एक गोष्ट सोडल्यास भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगलीच झाली होती. आजच्या सामन्यात काही चुका सुधारण्यावर टीम इंडियाचे लक्ष्य असणार आहे. आजचा सामना जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्याचा रोहित शर्मा ( Rohit Sharma) अँड कंपनीचा मानस आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 


आयपीएल २०२१त ३२ विकेट्स घेऊन इतिहास रचणाऱ्या हर्षल पटेलला ( Harshal Patel) यानं आजच्या सामन्यातून पदार्पण केलं. भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकर याच्या हस्ते हर्षलला टीम इंडियाची कॅप दिली गेली. आयपीएलच्या एकाच पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा हर्षल पटेल हा सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला. त्यानं जसप्रीत बुमराहनं मागील पर्वात नोंदवलेला २७ विकेट्सचा विक्रम मोडला.  भुवनेश्वर कुमारनं ( SRH) २०१७मध्ये २६ , जयदेव उनाडकटनं २०१७ मध्ये ( RPS) २४ व हरभजन सिंग २०१३मध्ये ( MI) २४ विकेट्स घेतल्या होत्या. पहिल्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या मोहम्मद सिराजच्या जागी त्याला संधी मिळाली आहे. 

भारतीय संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, वेंकटेश अय्यर, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल

न्यूझीलंड संघ - मार्टिन गप्टिल, डेरेल मिचेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप, टीम सेईफर्ट (यष्टिरक्षक), टीम साऊदी (कर्णधार),   ट्रेंट बोल्ट, एडम मिल्ने, जिमी निशॅम, इश सोढी, मिचेल  सँटनर 

Web Title: IND vs NZ, 2nd T20I Live Updates : Harshal Patel makes his T20I debut for India, India won the toss and decided to bowl first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.