IND vs NZ, 2nd T20I Live : वॉशिंग्टन सुंदरने स्वतःची विकेट फेकून सूर्यकुमार यादवला जीवदान दिले; तरीही SKY त्याच्यावर भडकला, Video

India vs New Zealand, 2nd T20I Live : न्यूझीलंडच्या गोलंदाजांनीही उल्लेखनीय कामगिरी करताना भारतावर दडपण बनवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 10:15 PM2023-01-29T22:15:24+5:302023-01-29T22:17:39+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 2nd T20I Live : Washington Sundar kept yelling there's no single there, but Suryakumar Yadav kept running, In the end, Washington had to sacrifice his wicket, Video  | IND vs NZ, 2nd T20I Live : वॉशिंग्टन सुंदरने स्वतःची विकेट फेकून सूर्यकुमार यादवला जीवदान दिले; तरीही SKY त्याच्यावर भडकला, Video

IND vs NZ, 2nd T20I Live : वॉशिंग्टन सुंदरने स्वतःची विकेट फेकून सूर्यकुमार यादवला जीवदान दिले; तरीही SKY त्याच्यावर भडकला, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 2nd T20I Live : न्यूझीलंडच्या गोलंदाजांनीही उल्लेखनीय कामगिरी करताना भारतावर दडपण बनवले. त्याच दडपणाखाली भारतीय फलंदाजांकडून चूका झाल्या. इशान किशन रन आऊट झाला. सूर्यकुमार यादवला वाचवण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरने स्वतःला रन आऊट करून घेतले. तरीही सूर्यकुमार यादव त्याच्यावर भडकलेला दिसला. 

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर शेफाली वर्मा ढसाढसा रडली, त्यामागे आहे २०२०ची Emotional कहाणी!

भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना न्यूझीलंडच्या धावगतीवर वेसण घातले. युझवेंद्र चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा निर्णय योग्य ठरला. भारताच्या चार फिरकीपटूंनी किवी फलंदाजांना तालावर नाचवले आणि त्यांनी कसाबसा शतकी पल्ला गाठला. युझवेंद्र चहलने आज मोठा विक्रम नोंदवला. चहलने निर्धाव षटक टाकून एक विकेट घेतली. भारताकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक ९१ विकेट्स घेत भुवनेश्वर कुमारचा ( ९०) विक्रम मोडला. युझवेंद्र, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पांड्या व दीपक हुडा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अर्शदीप सिंगने दोन विकेट्स घेतल्या. न्यूझींलडचा कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक १९*धावा केल्या. मार्क चॅम्पमन ( १४) व मायकेल ब्रेसवेल ( १४) यांनी संघर्ष केला. दीपक हुडा ( १-१७) व कुलदीप ( १-१७) यांनी चार षटकांत किवींना जखडून ठेवले. न्यूझीलंडला ९९ धावाच करता आल्या.


शुभमन गिल व इशान किशन यांनी सावध सुरूवात करताना १७ धावांची सलामी दिली. शुभमन ११ धावांवर बाद झाला. इशान व राहुल त्रिपाठी यांनी २८ धावांची भागीदारी केली. पण, इशान ( १९) रन आऊट झाला. इशानने दुसऱ्या रन साठी कॉल दिला, परंतु राहुलने त्याला माघारी जाण्यास सांगितले. तोपर्यंत ग्लेन फिलिप्सने वेगवान थ्रो केला अन् सँटनरे रन आऊट केले. किवी गोलंदाजही चांगला मारा करताना दिसले अन् भारताला धावांसाठी संघर्ष करावा लागला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात राहुल ( १३) इश सोढीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. वॉशिंग्टन सुंदरला फलंदाजीला पाठवले अन् त्याने सूर्याकुमार यादवसह डाव सावरला होता. पण, दोघांमधील ताळमेळ चुकले अन् वॉशिंग्टनला १० धावांवर रन आऊट होऊन माघारी जावे लागले.

इश सोढीच्या चेंडूवर सूर्याने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, किवींनी LBW साठी जोरदार अपील केले. सूर्या धावा घेण्यासाठी पळाला, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला उभा असलेल्या वॉशिंग्टन सुंदर त्याला नाही म्हणाला. तरीही सूर्या पळत राहिला अन् एकमेकांकडे पाहत नाराजी व्यक्त केली. वॉशिने सूर्यासाठी त्याची विकेट फेकली. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs NZ, 2nd T20I Live : Washington Sundar kept yelling there's no single there, but Suryakumar Yadav kept running, In the end, Washington had to sacrifice his wicket, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.