India vs New Zealand, 2nd Test, Day 1 Stumps: पुण्याच्या मैदानात सुरु असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी न्यूझीलंड संघाचा पहिला डाव २५९ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवातही केली. पहिल्या दिवसाच्या खेळातील काही मोजकी षटके शिल्लक असताना भारतीय संघाने रोहित शर्माच्या रुपात पहिली विकेट गमावली. पहिल्या डावातील तिसऱ्या षटकात धावफलकावर १ धाव असताना रोहित शर्मा तंबूत परतला. त्याला खातेही उघडता आले नाही.
यशस्वी जैस्वाल- शुबमन गिल जोडीवर असतील नजरा
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारतीय संघानं पहिल्या डावातील ११ षटकांच्या खेळात १ बाद १६ धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल २५ चेंडूचा सामना करून ६ धावांवर खेळत होता. दुसरीकडे शुबमन गिलनं ३२ चेंडूचा सामना करुन १० धावा काढल्या होत्या. भारतीय संघ अजूनही २४३ धावांनी पिछाडीवर असून दुसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलच्या जोडी भारतीय संघाला मजबूत स्थितीत नेईल, अशी अपेक्षा आहे. तमाम क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या जोडीवर खिळलेल्या असतील.
पहिल्या दिवशी कुणाचं पारडं अधिक जड?
भारत-न्यूझीलंड या दोन्ही संघाचा विचार करता पहिला दिवस हा सम-समान राहिला. डेवॉन कॉन्वे आणि रचिन रवींद्र यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या डावात २५९ धावा केल्या. पहिल्या दोन सत्राच्या खेळात दोन्ही संघाची कामगिरी तोडीस तोड होती. तिसऱ्या सत्रातही तोच सीन पाहायला मिळाला. त्यामुळे हा सामना रंगतदार होणार, याचे संकेत मिळत आहेत.
भारतीय संघ पहिला डाव १ बाद १६ धावा
- रोहित शर्मा- ० (९)
- टिम साउदी ३ षटकात ४ धावा खर्च करून १ विकेट
न्यूझीलंड पहिला डाव- सर्व बाद २५९
टॉम लॅथम १५ (२२), डेवॉन कॉन्वे ७६ (१४१), विल यंग १८ (४५), रचिन रवींद्र ६५ (१०५), डॅरियल मिटेल १८ (५४), टॉम बंडेल ३ (१२), ग्लेन फिलिप्स ९ (३१), सँटनर ३३(५१), साउदी ५ (८), एजाज पटेल ४(९), विल्यम पीटर ओ'रुर्क ०(०)*
भारतीय संघाची गोलंदाजी
- वॉशिंग्टन सुंदर २३.१ षटकात ५९ धावा खर्च करून ७ विकेट्स
- आर. अश्विन २४ षटकात ६४ धावा खर्च करून ३ विकेट्स