India vs New Zealand, 2nd Test Live Update : ४ बाद २२१ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरूवात करणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याच षटकात दोन धक्के बसले. भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी चार विकेट्स घेणाऱ्या अजाझ पटेलनं ( Ajaz Patel) पहिल्याच षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या. त्यानं वृद्धीमान सहाला LBW केल्यानंतर अप्रतिम चेंडूवर आर अश्विनचा ( R Ashwin) त्रिफळा उडवला. विकेट घेतल्यानंतर किवी खेळाडू जल्लोष करत असताना अश्विन DRSची मागणी करताना दिसला. आपण नेमकं कसं बाद झालोय, हेच त्याला कळेनासे झाले होते.
याच कसोटीच्या पहिल्या दिवशी DRS वरून मोठा वाद झाला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीला मैदानावरील अम्पायर व तिसऱ्या अम्पायरनं चुकीचं बाद दिले. अजाझ पटेलच्या चेंडूवर विराटसाठी LBWची अपील झाली. त्यावर मैदानावरील पंचांनी बाद असल्याचा निर्णय दिला. विराटनं लगेचच DRS घेतला अन् तिसऱ्या पंचालाही ठोस निर्णय घेता आला नाही आणि त्यानं मैदानावरील पंचाचा निर्णय कायम राखला. पण, रिप्लेत चेंडू बॅटला लागल्यानंतर पॅडला लागल्याचे स्पष्ट दिसत होते. तरीही तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर सर्वांना टीका केली होती.
पाहा व्हिडिओ..
मयांक अग्रवाल (Mayank Agarwal ) व शुबमन गिल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. विलंबानं सुरू झालेल्या या सामन्यात मयांकनं शतकी खेळी करून टीम इंडियाला मजबूत स्थितित आणले. मयांक व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला ८० धावांची भागीदारी उभारून दिली, परंतु ३ फलंदाज पटापट माघारी परतले. गिल ७१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४४ धावांवर झेलबाद झाला. चेतेश्वर पुजारा पुन्हा अपयशी ठरला. कर्णधार विराट कोहलीला चूकीच्या निर्णयाचा फटका बसला. पण, मयांकनं श्रेयस अय्यर व वृद्धीमान सहा यांच्यासह टीम इंडियाचा डाव सावरला पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या ४ बाद २२१ धावा झाल्या होत्या मयांक २४६ चेंडूंचा सामना करताना १४ चौकार व ४ षटकारांसह १२० धावांवर, तर सहा २३ धावांवर खेळत होते.
Web Title: IND vs NZ, 2nd Test Live Update : 2 in 2 for Ajaz Patel, he cleans up R Ashwin with a beauty Ashwin trying to review a clean bowled, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.