India vs New Zealand, 2nd Test Live Update : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याची विकेट हा दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसातील चर्चेचा विषय ठरला आहे. अजाझ पटेलच्या गोलंदाजीवर विराटला LBW दिले गेले, तिसऱ्या अम्पायरलाही नेमकं काय झालं ते कळलं नाही आणि त्यानं मैदानावरील अम्पायरचा निर्णय कायम राखला. चेंडू आधी पॅडला लागला की बॅटला यावरून तिसरा अम्पायर गोंधळला. पण, त्याच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार धुलाई झाली. पार्थिव पटेल, वासीम जाफर यांच्यासह बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनीही अम्पायरच्या निर्णयावर टीका केली.
नेमकं काय झालं?
सातत्यानं अपयशी ठरत असलेल्या चेतेश्वर पुजाराकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. अजाझ पटेलनं टाकलेल्या ३०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विराटसाठी LBWची जोरदार अपील झाली. मैदानावरील अम्पायर अनिल चौधरी यांनी विराटला बाद दिले. त्यानंतर विराटनं लगेच DRS घेतला. टिव्ही अम्पायर वीरेंद्र शर्मा यांनी अनेक वेळा रिप्ले पाहिला आणि त्यांनाही चेंडू आधी पॅडला लागलाय की बॅटला हेच स्पष्ट दिसले नाही. त्यामुळे त्यांनी मैदानावरील अम्पायरचा निर्णय कायम राखताना विराटला बाद दिले. यावेळी वीरेंद्र शर्मा यांनी बॉल ट्रॅकींग डिव्हाईस न पाहताच विराटला बाद दिल्याचेही दिसले. खरंच चेंडू पहिला पॅडला लागला होता की नाही, यावरून वाद सुरू झालाय. विराटनंही या निर्णयाची दाद मागितली अन् पेव्हेलियनमध्ये जाऊन रिप्ले पाहून डोक्यावर हात मारला.
बघा कोणाच्या काय रिअॅक्शन
Web Title: IND vs NZ, 2nd Test Live Update : Ex-Indian cricketers slammed the decision making that saw captain Virat Kohli be dismissed for a duck
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.