India vs New Zealand, 2nd Test Live Update : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीला सुरुवात होण्यात पावसाचा अडथळा असताना दुखापतींचे सत्र सुरू झाले आहे. टीम इंडियाच्या ताफ्यातून अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane), इशांत शर्मा ( Ishant Sharma) व रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांनी दुखापतीमुळे माघार घेतल्याचे वृत्त BCCIनं दिलं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच चौथ्या खेळाडूनं माघार घेतल्याचे वृत्त समोर आले. दरम्यान, मुंबईत दोन दिवस पाऊस पडल्यामुळे वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी अजूनही ओली आहे. ती सुकवण्याचं काम सुरू आहे आणि आता १०.३० वाजता पुन्हा खेळपट्टीची पाहणी करण्यात येणार आहे.
जलदगती गोलंदाज इशांत शर्मा याच्या डाव्या हाताच्या करंगळीला कानपूर कसोटीच्या अखेरच्या दिवशी दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो बराच काळ मैदानाबाहेर होता. बीसीसीआयची वैद्यकिय टीम त्याच्यावर उपचार करत आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्याही उजव्या हाताला दुखापत झाली आहे आणि त्याच्या हाताला सूज आली आहे त्यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला दिला गेला असून तोही मुंबई कसोटीत खेळणार नाही. उपकर्णधार अजिंक्य रहाणे यालाही पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली आणि त्यानंही या सामन्यातून माघार घेतली आहे.
किवी कर्णधार केन विलियम्सनची माघार
भारताचे तीन खेळाडू दुखापतीमुळे माघारी परतले असताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ( captain Kane Williamson) यानंही आजच्या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. केन मागील बरेच महिने डाव्या कोपऱ्याच्या दुखापतीशी झगडत आहे. मुंबई कसोटीपूर्वीही या दुखापतीनं डोकं वर काढलं आणि त्यानं माघार घेतली, असे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितले.
Web Title: IND vs NZ, 2nd Test Live Update : Kiwi captain Kane Williamson will miss the second Test as he continues to battle the left-elbow injury
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.