India vs New Zealand, 2nd Test Live Update : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस दुसऱ्या सत्रापासून सुरू झाला. पावसामुळे खेळपट्टी व मैदान ओलसर असल्यामुळे सकाळी ९.३० वाजता पहिल्या दिवसाची सुरूवात न होता ती १२ वाजता झाली. आजच्या सामन्यात टीम इंडियाच्या ताफ्यातून अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane), इशांत शर्मा ( Ishant Sharma) व रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांनी, तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यानं दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे दोन्ही संघांत कोणते बदल पाहायला मिळेल, याची सर्वांना उत्सुकता होती. विराट कोहलीनं नाणेफेक जिंकली अन् स्टेडियमवर जल्लोष झाला. भारत प्रथम फलंदाजी करणार आहे.
जलदगती गोलंदाज इशांत शर्मा याच्या डाव्या हाताच्या करंगळीला कानपूर कसोटीच्या अखेरच्या दिवशी दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो बराच काळ मैदानाबाहेर होता. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्याही उजव्या हाताला दुखापत झाली आहे आणि त्याच्या हाताला सूज आली आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणे यालाही पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली आणि त्यानंही या सामन्यातून माघार घेतली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ( captain Kane Williamson) यानंही आजच्या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. केन मागील बरेच महिने डाव्या कोपऱ्याच्या दुखापतीशी झगडत आहे.
भारतीय संघात तीन बदल पाहायला मिळाले. अजिंक्यच्या जागी विराट कोहली, इशांतच्या जागी मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजाच्या जागी जयंत यादव याची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली. ( Jayant Yadav, Virat Kohli and Mohammad Siraj replaces Ravindra Jadeja, Ajinkya Rahane and Ishant Sharma.)
भारतीय संघ - मयांक अग्रवाल, शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, वृद्धीमान सहा, जयंत यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, उमेश यादव ( India (Playing XI): Mayank Agarwal, Shubman Gill, Cheteshwar Pujara, Virat Kohli(c), Shreyas Iyer, Wriddhiman Saha(w), Ravichandran Ashwin, Axar Patel, Jayant Yadav, Umesh Yadav, Mohammed Siraj)
न्यूझीलंड संघ - टॉम लॅथम ( कर्णधार), विल यंग, डॅरील मिचेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम प्लंडल, राचिन रविंद्र, कायले जेमिन्सन, टीम साऊदी, विलियम सोमरविले, अजाझ पटेल ( New Zealand (Playing XI): Tom Latham(c), Will Young, Daryl Mitchell, Ross Taylor, Henry Nicholls, Tom Blundell(w), Rachin Ravindra, Kyle Jamieson, Tim Southee, William Somerville, Ajaz Patel)