India vs New Zealand, 2nd Test Live Update : मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) पुन्हा सूत्र हाती घेतली. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटनं केवळ यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धीमान सहा तंदुरुस्त झाल्याची माहिती दिली. पण, शुक्रवारी सामना सुरू होण्यास अर्धातासांचा कालावधी शिल्लक असताना बीसीसीआयनं मेल पाठवला अन् त्यात अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane), इशांत शर्मा ( Ishant Sharma) व रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांना दुखापत झाल्यामुळे त्यांनी माघार घेतल्याचे म्हटले. बीसीसीआयच्या या वृत्तावर माजी महान फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण ( VVS Laxman) यानं आश्चर्य व्यक्त केलं. या दुखापती आज सकाळी झाल्या असाव्याय, असा अंदाज व्यक्त करताना त्यानं विराटनं याबाबत काल झालेल्या पत्रकार परिषदेत काहीच सांगितले नसल्याचे म्हटले.
''आज सकाळी हे सर्व जखमी झालेत का?, कारण काल झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं काही सांगितले नाही. टीम इंडियासाठी हा मोठा धक्का आहे. इंग्लंड मालिकेत जडेजाला दुखापत झाली आणि अक्षर पटेलची एन्ट्री झाली. त्यानं त्या मालिकेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. ज्याप्रकारे त्यानं गोलंदाजी केली, ते अप्रतिम होतं. आता विराट कोहलीच्या जागी संधी मिळालेल्या श्रेयस अय्यरनं संघ प्रचंड दडपणात असतानाही अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली. त्यामुळे भारतीय संघाकडे तगडे पर्याय आहेत.''
या दुखापतीमुळे विराट कोहलीचा प्लेइंग इलेव्हन निवडण्याचं काम सोपं केल्याचंही लक्ष्मणला वाटतं. तो म्हणाला,'' मयांक अग्रवालचे संघातील स्थान कायम राहील. अजिंक्य रहाणेच्या दुखापतीमुळे फलंदाजांमध्ये बदल करण्याची गरज नाही. विराट कोहली त्याच्या जागी खेळले. इशांत शर्माच्या जागी मोहम्मद सिराज याला संधी मिळेल, परंतु रवींद्र जडेजाच्या जागी कोणाला संधी मिळेल?; जयंत यादव संघात असल्यानं भारतीय संघ अतिरिक्त फिरकीपटूसह खेळेल किंवा एक अतिरिक्त फलंदाज खेळवेल. हे नाणेफेकीच्या वेळेस कळेल.''
Web Title: IND vs NZ, 2nd Test Live Update : VVS Laxman shocked at India's injury blows; names Rahane, Ishant, Jadeja's replacements
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.