Join us  

IND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं कसोटीतील सर्वात मोठा विजय मिळवला, पण WTCमध्ये पाकिस्तानला धक्का देण्यात अपयशी ठरला; कानपूरचा निकाल महागात पडला

India vs New Zealand, 2nd Test Live Updates : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 11:09 AM

Open in App

India vs New Zealand, 2nd Test Live Updates : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला. भारतानं ठेवलेल्या ५४० धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा दुसरा डाव १६७ धावांवर गडगडला. भारतानं हा सामना ३७२ धावांनी जिंकला, भारताचा हा कसोटीतील सर्वात मोठा विजय ठरला. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship ) स्पर्धेतील भारताची ही दुसरी मालिका आहे आणि या विजयासह त्यांनी खात्यात १२ गुणांची भर घातली आहे. पण, ४२ गुण असूनही टीम इंडियाला क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. श्रीलंकापाकिस्तान यांच्या खात्यात प्रत्येकी २४ गुण असूनही ते अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जाणून घ्या कारण...   भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. भारतानं ७ बाद २७६ धावांवर  दुसरा डाव घोषित केला. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात हेन्री निकोल्स ( ४४) व डॅरील मिचेल ( ६०)  यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला सामना केला. मिचेलनं वैयक्तिक अर्धशतकासह निकोल्सह ७३ धावांची भागीदारी केली. निकोल्स व मिचेल यांच्याशिवाय न्यूझीलंडच्या अन्य फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. न्यूझीलंडचा डाव १६७ धावांवर गुंडाळून भारतानं ३७२ धावांनी विजय मिळवला. आर अश्विन व जयंत यादव यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या. 

भारतानं घरच्या मैदानावर २०१३पासून सुरू असलेली कसोटी मालिका विजयाची परंपरा कायम राखली. भारताचा हा घरच्या मैदानावरील १४वा कसोटी मालिका विजय ठरला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा ११वा कसोटी मालिका विजय ठरला. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावरील भारताचा हा सलग चौथा कसोटी मालिका विजय आहे. भारतानं घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध १२ कसोटी मालिका खेळल्या आणि त्यापैकी एकही गमावली  नाही.   जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा गुणतक्ता...भारतानं या विजयासह WTCमध्ये १२ गुण कमावले. त्यांच्या खात्यात एकूण ३ विजय, १ पराभव व २ ड्रॉ अशा निकालांसह ४२ गुण जमा झाले आहेत. भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकापाकिस्तान यांच्या खात्यात प्रत्येकी २४ गुण असले तरी त्यांची विजयाची टक्केवारी भारतापेक्षा वरचढ आहे. भारतानं कानपूर कसोटी जिंकली असती तर ते या क्रमवारीत पुढे गेले असते. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धापाकिस्तानश्रीलंका
Open in App