IND vs NZ : छोटा पॅकेट बडा धमाका! सचिन-कोहलीला जमलं नाही ते 'यशस्वी' करुन दाखवलं

ind vs nz 2nd test : यशस्वी जैस्वालची ऐतिहासिक कामगिरी.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 02:31 PM2024-10-26T14:31:38+5:302024-10-26T14:51:45+5:30

whatsapp join usJoin us
ind vs nz 2nd test match live updates yashasvi jaiswal become 3rd indian to score 1000  | IND vs NZ : छोटा पॅकेट बडा धमाका! सचिन-कोहलीला जमलं नाही ते 'यशस्वी' करुन दाखवलं

IND vs NZ : छोटा पॅकेट बडा धमाका! सचिन-कोहलीला जमलं नाही ते 'यशस्वी' करुन दाखवलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

yashasvi jaiswal become 3rd indian to score 1000 : भारतीय संघाचा युवा खेळाडू यशस्वी जैस्वालची अप्रतिम कामगिरी सुरुच आहे. न्यूझीलंडलविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने स्फोटक खेळी केली. या डावातील अर्धशतकी खेळीसह यशस्वीने ऐतिहासिक कामगिरी केली. दिग्गज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांना न जमलेली कामगिरी करण्यात त्याला यश आले. पुणे कसोटी जिंकण्यासाठी न्यूझीलंडने भारतासमोर ३५९ धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वीने स्फोटक खेळी करुन भारताला चांगली सुरुवात करुन दिली. या डावात त्याने अर्धशतकी खेळी करताना चालू वर्षात मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये १ हजार धावांचा आकडा गाठला. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. 

जागतिक क्रिकेटमध्ये एका वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या घरात एक हजार धावांचा आकडा गाठणारा यशस्वी जैस्वाल हा सातवा खेळाडू ठरला आहे. या यादीत भारताचे माजी खेळाडू गुंडप्पा विश्वनाथ अव्वल स्थानी आहेत. याशिवाय माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचाही या यादीत समावेश आहे. आता तब्बल ४५ वर्षांनंतर आणखी एका भारतीय फलंदाजाला ही किमया साधता आली.

मायदेशात एका कॅलेंडर वर्षात १ हजारहून अधिक धावा करणारे खेळाडू
गुंडप्पा विश्वनाथ (१९७९) - १०४७ धावा
सुनील गावस्कर (१९७९) - १०१३ धावा
ग्राहम गूच (१९९०) - १०५८ धावा
जस्टिन लँगर (२००४) - १०१२ धावा
मोहम्मद युसूफ (२००६) - ११२६ धावा
मायकल क्लार्क (२०१२) - १४०७ धावा
यशस्वी जैस्वाल (२०२४) - १०००* धावा

Web Title: ind vs nz 2nd test match live updates yashasvi jaiswal become 3rd indian to score 1000 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.