yashasvi jaiswal become 3rd indian to score 1000 : भारतीय संघाचा युवा खेळाडू यशस्वी जैस्वालची अप्रतिम कामगिरी सुरुच आहे. न्यूझीलंडलविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने स्फोटक खेळी केली. या डावातील अर्धशतकी खेळीसह यशस्वीने ऐतिहासिक कामगिरी केली. दिग्गज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांना न जमलेली कामगिरी करण्यात त्याला यश आले. पुणे कसोटी जिंकण्यासाठी न्यूझीलंडने भारतासमोर ३५९ धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वीने स्फोटक खेळी करुन भारताला चांगली सुरुवात करुन दिली. या डावात त्याने अर्धशतकी खेळी करताना चालू वर्षात मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये १ हजार धावांचा आकडा गाठला. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये एका वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या घरात एक हजार धावांचा आकडा गाठणारा यशस्वी जैस्वाल हा सातवा खेळाडू ठरला आहे. या यादीत भारताचे माजी खेळाडू गुंडप्पा विश्वनाथ अव्वल स्थानी आहेत. याशिवाय माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचाही या यादीत समावेश आहे. आता तब्बल ४५ वर्षांनंतर आणखी एका भारतीय फलंदाजाला ही किमया साधता आली.
मायदेशात एका कॅलेंडर वर्षात १ हजारहून अधिक धावा करणारे खेळाडूगुंडप्पा विश्वनाथ (१९७९) - १०४७ धावासुनील गावस्कर (१९७९) - १०१३ धावाग्राहम गूच (१९९०) - १०५८ धावाजस्टिन लँगर (२००४) - १०१२ धावामोहम्मद युसूफ (२००६) - ११२६ धावामायकल क्लार्क (२०१२) - १४०७ धावायशस्वी जैस्वाल (२०२४) - १०००* धावा