Join us  

IND vs NZ, 3rd ODI Live : एकही सामना नाही खेळवला, त्याच्या हातात रोहित शर्माने विजयी चषक सोपवला, Video

India vs New Zealand, 3rd ODI Live : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात ९५ धावांनी न्यूझीलंडवर विजय मिळवला. भारताच्या ३८५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ २९५ धावांवर तंबूत परतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 9:39 PM

Open in App

India vs New Zealand, 3rd ODI Live : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात ९५ धावांनी न्यूझीलंडवर विजय मिळवला. भारताच्या ३८५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ २९५ धावांवर तंबूत परतला. भारताने ही मालिका ३-० अशी जिंकून आयसीसी वन डे क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. भारतीय संघ ट्वेंटी-२०तही अव्वल स्थानावर आहे आणि कसोटीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकून भारताला कसोटीत अव्वल येण्याची संधी आहे. मालिका विजयानंतर रोहितने विजयी चषक युवा खेळाडूच्या हाती देण्याची परंपरा कायम राखली. या मालिकेत संघात नाव असूनही एकही सामना खेळण्याची संधी न मिळालेल्या खेळाडूच्या हाती रोहितने चषक सोपवला.

रोहित शर्माने एकाही भारतीय कर्णधाराला न जमलेली कामगिरी केली; एका दगडात मारले दोन पक्षी

रोहित ८५ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकार खेचून १०१ धावांवर त्रिफळाचीत  झाला. त्यानंतर शुभमन ७८ चेंडूंत १३ चौकार व ५ षटकारांसह ११२ धावांवर ब्लेअर टिकनरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. इशान व विराट यांनी ३८ धावांची भागीदारी केली. इशान १७ धावांवर रन आऊट झाला, पाठोपाठ विराट ३६ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव ( १४) व वॉशिंग्टन सुंदर ( ९) हेही माघारी परतले. हार्दिक पांड्या व शार्दूल ठाकूर यांनी ३४ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. शार्दूल १७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह २५ धावांवर माघारी परतला. हार्दिक ३८ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर बाद झाला.  भारताने ९ बाद ३८५ धावा केल्या. 

फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर न्यूझीलंडकडूनही जबरदस्त खेळ होईल अशी अपेक्षा होती, परंतु हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात फिन अ‌ॅलनला माघारी पाठवले. डेव्हॉन कॉनवे व हेन्री निकोल्स ( ४२) यांनी १०६ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडचा डाव रुळावर आणला. त्यानंतर कॉनवे व  डॅरील मिचेल ( २४) यांची ७८ धावांची सेट झालेली जोडी शार्दूल ठाकूरने तोडली. शार्दूलने ९ चेंडूंत ३ विकेट्स घेत मॅच फिरवली. कॉनवे १०० चेंडूंत १२ चौकार व ८ षटकारांसह १३८ धावांवर माघारी परतला. मायकेल ब्रेसवेल व मिचेल सँटनर ही जोडी खेळपट्टीवर होती, पण आज ती कमाल करू शकली नाही. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ २९५ धावांवर माघारी परतला आणि भारताने ९० धावांनी सामना जिंकला. शार्दूल व कुलदीप यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. 

रोहितने विजयी षटक राखीव यष्टीरक्षक केएस भरतच्या हाती दिला अन्  स्वतः लांब उभा राहिला.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्मा
Open in App