IND vs NZ, 3rd ODI Live : आधी बोलावले, मग मागे पाठवले; विराट कोहलीने न ऐकल्यासारखे केले अन् इशानला बाद व्हावे लागले, Video  

India vs New Zealand, 3rd ODI Live : रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी बेक्कार धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 04:17 PM2023-01-24T16:17:14+5:302023-01-24T16:17:47+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 3rd ODI Live : Horrible mix-up! What happened there? Ishan Kishan is run out, Virat Kohli survives, Video    | IND vs NZ, 3rd ODI Live : आधी बोलावले, मग मागे पाठवले; विराट कोहलीने न ऐकल्यासारखे केले अन् इशानला बाद व्हावे लागले, Video  

IND vs NZ, 3rd ODI Live : आधी बोलावले, मग मागे पाठवले; विराट कोहलीने न ऐकल्यासारखे केले अन् इशानला बाद व्हावे लागले, Video  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 3rd ODI Live : रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी बेक्कार धुलाई केली. रोहितने ३ वर्षांनंतर वन डेत शतक झळकावले आणि त्यापाठोपाठ गिलनेही शतक पूर्ण केले. शुभमन गिलने आजच्या खेळीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याच्या विक्रमाशी बरोबरी केली. हे दोघंही लागोपाठ माघारी परतल्यानंतर विराट कोहलीइशान किशन ही नवी जोडी मैदानावर होती. नवी जोडी असल्याने भारताच्या धावांचा वेग थोडा मंदावला अन् त्यात एक विचित्र प्रकार घडला... 

शुभमन गिलने विराटसोबत स्पर्धा करणाऱ्या बाबर आजमची जीरवली; वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी 


आजच्या सामन्यात रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी ७८ चेंडूंत शतकी आकडा फलकावर चढवला. रोहितने वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांत तिसरे स्थान पटकावले. शाहिद आफ्रिदी ३५१ आणि ख्रिस गेल ३३१ षटकारांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने आज २७३* वा षटकार खेचला अन् सनथ जयसूर्याचा ( २७०) विक्रम मोडला.  शुभमन गिलनेही तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला. त्याने या मालिकेत ३१४+ धावा करताना विराट कोहलीचा ( २८३ धावा वि. श्रीलंका, २०२३) विक्रम मोडला. 

रोहित शर्मा ८५ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकार खेचून १०१ धावांवर बाद  झाला. शुभमन गिल ७८ चेंडूंत १३ चौकार व ५ षटकारांसह ११२ धावांवर माघारी परतला. इशान व विराट यांनी ३८ धावांची भागीदारी केली, परंतु ३५व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर दोघांमध्ये ताळमेळ तुटलेले दिलसेय. डफीच्या गोलंदाजीवर इशानने फटका मारला अन् एक धाव घेण्यासाठी कॉल दिला. नॉन स्ट्रायकर एंडवर असलेला कोहली सुसाट पळाला, परंतु तो मध्यावर येताच इशानने त्याला माघारी जाण्यास सांगितले. विराटने त्याकडे न ऐकल्यासारखे केले व स्ट्रायकर एंडपर्यंत पोहोचला. विराटची विकेट पडू नये यासाठी इशानने त्याचा वेग कमी केला व विराटला प्रथम क्रिज क्रॉस करू दिले. इशान १७ धावांवर रन आऊट होऊन माघारी परतला. विराटही फार काळ खेळपट्टीवर टिकला नाही आणि तो ३६ धावांवर बाद झाला.  


सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs NZ, 3rd ODI Live : Horrible mix-up! What happened there? Ishan Kishan is run out, Virat Kohli survives, Video   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.