Join us  

IND vs NZ Live: भारतीय सलामीवीरांचा रूद्रावतार! रोहित-गिल दोघांचेही शतक; न्यूझीलंडची उडाली दाणादाण

IND vs NZ, 3rd ODI Live: आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 3:26 PM

Open in App

इंदूर : आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात आहे. खरं तर मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने मालिकेवर कब्जा केला आहे. त्यामुळे आजचा सामना टीम इंडियासाठी केवळ औपचारिकताच असणार आहे. पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करायला आलेल्या रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या जोडीने किवी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भारतीय सलामीवीरांनी पहिल्या 10 षटकांत 82 धावा कुटल्या. रोहित शर्मा शतक ठोकून बाद झाला. हिटमॅनच्या या शतकी खेळीमध्ये 9 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे. 

शुबमन गिलने देखील शानदार खेळी करत आपल्या कर्णधाराला चांगली साथ दिली. 26. 1 षटकांपर्यंत भारतीय संघाची धावसंख्या 212 एवढी झाली असून रोहित-गिलच्या शानदार भागीदारीमुळे भारत मजबूत स्थितीत पोहचला आहे. रोहित शर्मा 85 चेंडूत 101 धावा करून बाद झाला, तर शुबमन गिलने 72 चेंडूत 103 धावा करून आपले शतक पूर्ण केले आहे. हिटमॅनचे हे त्याच्या वन डे कारकिर्दीतील 30 वे शतक ठरले आहे. 103 धावांवर रोहित शर्माचा त्रिफळा उडाला.  2019 च्या वन डे विश्वचषकानंतर रोहित-गिल यांची आजची भागीदारी सर्वोत्तम ठरली आहे. 

वन डे मध्ये सर्वाधिक शतक करणारे खेळाडू -

  • सचिन तेंडुलकर - 49 
  • विराट कोहली - 46  
  • रोहित शर्मा  - 30  
  • रिकी पॉटिंग  - 30  

   किवी संघासाठी अस्तित्वाची लढाई दरम्यान, आजच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात अनेक बदल केले जातील अशी अपेक्षा होती. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल झाला नाही. कारण अगोदरच मालिका खिशात घातल्यामुळे वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन बाकावर असलेल्यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, संघात 2 बदल केले असून उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल यांना मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. आजचा सामना इंदौरमधील होळकर स्टेडियमवर पार पडत आहे. खरं तर न्यूझीलंडच्या संघासाठी आजचा सामना म्हणजे अस्तित्वाची लढाई असणार आहे. कारण पाहुण्या संघाने पहिले 2 सामने गमावून मालिका गमावली आहे. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल,  विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, उमरान मलिक.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडशुभमन गिलरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App