इंदौर : आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात आहे. खरं तर मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने मालिकेवर कब्जा केला आहे. त्यामुळे आजचा सामना टीम इंडियासाठी केवळ औपचारिकताच असणार आहे. मात्र, पाहुण्या किवी संघासमोर आपले अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान असेल. पाकिस्तानला त्यांच्याच घरात जाऊन पराभवाची धूळ चारणाऱ्या किवी संघाला भारतात आपली चमक दाखवता आली नाही. तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आजच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात अनेक बदल केले जातील अशी अपेक्षा होती. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल झाला नाही. कारण अगोदरच मालिका खिशात घातल्यामुळे वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन बाकावर असलेल्यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, संघात 2 बदल केले असून उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल यांना मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. आजचा सामना इंदौरमधील होळकर स्टेडियमवर पार पडत आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, उमरान मलिक.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"