India vs New Zealand, 3rd ODI Live : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) या दोघांनी ज्या प्रकारे सुरुवात करून दिली होती, ती पाहता भारतीय संघ आज ४०० धावा सहज पार करेल असे वाटले होते. २७व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर २१२ धावांची ही भागीदारी संपुष्टात आली आणि न्यूझीलंडने पुनरागमन केले. किवी गोलंदाजांनी ९७ धावांत भारताच्या ६ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या व शार्दूल ठाकूर यांनी अखेरच्या षटकात पुन्हा षटकारांची आतषबाजी करून शेवटही दणदणीत केला.
११ Six, २२ Fours! रोहित शर्मा अन् शुभमन गिल यांच्या २१३ धावांच्या खेळीचा १० मिनिटांचा Classy Video
आजच्या सामना रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी गाजवला. मैदानाचा असा कोणताच कोपरा नव्हता की जिथे या दोघांनी चेंडू पोहोचवला नसेल. रोहितचे पुल शॉट लाजवाब होते. त्याने स्टेडियमच्या दुसऱ्या माळ्यावर एक चेंडू पाठवला अन् किवी गोलंदाज त्याच्याकडे पाहत बसला. शुभमनने ऑफ साईडला मारलेला फ्लॅट सिक्स पाहून रोहितनेही दाद दिली. मिचेल ब्रेसवेलने ही भागीदारी संपुष्टात आणली. रोहित ८५ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकार खेचून १०१ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर शुभमन ७८ चेंडूंत १३ चौकार व ५ षटकारांसह ११२ धावांवर ब्लेअर टिकनरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. इशान व विराट यांनी ३८ धावांची भागीदारी केली. इशान १७ धावांवर रन आऊट झाला, पाठोपाठ विराट ३६ धावांवर बाद झाला.
किवी गोलंदाज आता भारताची एकही जोडी फार काळ टिकू देत नव्हते. सूर्यकुमार यादव ( १४) व वॉशिंग्टन सुंदर ( ९) हेही माघारी परतले. ० बाद २१२ वरून भारताची अवस्था ६ बाद ३१३ अशी झाली.
हार्दिक पांड्या व शार्दूल ठाकूर यांनी टीम इंडियाची लाज वाचवली. या दोघांनी आजच्या सामन्यातील दुसरी सर्वोत्तम भागादीरी नोंदवली. या दोघांनी ३४ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. शार्दूल १७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह २५ धावांवर माघारी परतला. हार्दिकने ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. भारताची धावसंख्या चारशेपार नेण्याच्या प्रयत्नात हार्दिक ३८ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर बाद झाला. किवी गोलंदाज जेकब डफीने १० षटकांत १०० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. भारताने ९ बाद ३८५ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs NZ, 3rd ODI Live : Rohit Sharma (101) & Shubman Gill ( 112) registered record breaking 212 runs partenership, India need to defend 385 to become the new No.1 Ranked ODI team.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.