IND vs NZ, 3rd ODI Live : ११ Six, २२ Fours! रोहित शर्मा अन् शुभमन गिल यांच्या २१३ धावांच्या खेळीचा १० मिनिटांचा Classy Video 

India vs New Zealand, 3rd ODI Live : रोहितने ३ वर्षांनंतर वन डेत शतक झळकावले आणि त्यापाठोपाठ गिलनेही शतक पूर्ण केले.  दोघंही लागोपाठ माघारी परतल्यानंतर भारताची धावगती संथ झालेली पाहायला मिळतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 04:35 PM2023-01-24T16:35:19+5:302023-01-24T16:36:21+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 3rd ODI Live : Rohit Sharma's classy century and Unstoppable Shubman Gill sparkling 112 (78) runs; Watch two masterclass century | IND vs NZ, 3rd ODI Live : ११ Six, २२ Fours! रोहित शर्मा अन् शुभमन गिल यांच्या २१३ धावांच्या खेळीचा १० मिनिटांचा Classy Video 

IND vs NZ, 3rd ODI Live : ११ Six, २२ Fours! रोहित शर्मा अन् शुभमन गिल यांच्या २१३ धावांच्या खेळीचा १० मिनिटांचा Classy Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 3rd ODI Live : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) या दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी बेक्कार धुलाई केली. रोहितने ३ वर्षांनंतर वन डेत शतक झळकावले आणि त्यापाठोपाठ गिलनेही शतक पूर्ण केले.  दोघंही लागोपाठ माघारी परतल्यानंतर भारताची धावगती संथ झालेली पाहायला मिळतेय. पण,  रोहित व शुभमन यांनी आजचा दिवस गाजवला. 

आधी बोलावले, मग मागे पाठवले; विराट कोहलीने न ऐकल्यासारखे केले अन् इशानला बाद व्हावे लागले, Video  


आजच्या सामन्यात रोहित शर्माशुभमन गिल यांनी आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी ७८ चेंडूंत शतकी आकडा फलकावर चढवला. रोहितने वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांत तिसरे स्थान पटकावले. शाहिद आफ्रिदी ३५१ आणि ख्रिस गेल ३३१ षटकारांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने आज २७३* वा षटकार खेचला अन् सनथ जयसूर्याचा ( २७०) विक्रम मोडला.  शुभमन गिलनेही तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला. त्याने या मालिकेत ३१४+ धावा करताना विराट कोहलीचा ( २८३ धावा वि. श्रीलंका, २०२३) विक्रम मोडला. 



रोहित शर्मा ८५ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकार खेचून १०१ धावांवर बाद  झाला. शुभमन गिल ७८ चेंडूंत १३ चौकार व ५ षटकारांसह ११२ धावांवर माघारी परतला. इशान व विराट यांनी ३८ धावांची भागीदारी केली. इशान १७ धावांवर रन आऊट होऊन माघारी परतला. विराटही फार काळ खेळपट्टीवर टिकला नाही आणि तो ३६ धावांवर बाद झाला.   


सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs NZ, 3rd ODI Live : Rohit Sharma's classy century and Unstoppable Shubman Gill sparkling 112 (78) runs; Watch two masterclass century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.