IND vs NZ, 3rd ODI Live : W,W, W! शार्दूल ठाकूरने तीन धक्के देत चेहऱ्यावर आणले हसू; पण, रोहित शर्माची खावी लागली बोलणी, Video

शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) सलग दोन चेंडूंत धक्के दिले अन् चेहऱ्यावरचे हसू परतले. पण, रोहित शर्माने त्याला झापले.  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 07:54 PM2023-01-24T19:54:02+5:302023-01-24T19:55:44+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 3rd ODI Live : Shardul Thakur gets 3rd wicket in the last 9 balls, New Zealand 5 down now, but he gave two 4s in last two ball, rohit sharma angry, Video  | IND vs NZ, 3rd ODI Live : W,W, W! शार्दूल ठाकूरने तीन धक्के देत चेहऱ्यावर आणले हसू; पण, रोहित शर्माची खावी लागली बोलणी, Video

IND vs NZ, 3rd ODI Live : W,W, W! शार्दूल ठाकूरने तीन धक्के देत चेहऱ्यावर आणले हसू; पण, रोहित शर्माची खावी लागली बोलणी, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 3rd ODI Live : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) या दोघांनी ज्या प्रकारे सुरुवात केली, ती पाहून न्यूझीलंडकडूनही पलटवार अपेक्षित होता. हार्दिक पांड्याने पहिल्या षटकात किवींना धक्का दिल्यानंतर डेव्हॉन कॉनवेने शतक झळकावून भारतीयांचे टेंशन वाढवले होते. पण, शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) सलग दोन चेंडूंत धक्के दिले अन् चेहऱ्यावरचे हसू परतले. पण, रोहित शर्माने त्याला झापले.   

रोहित शर्मा-शुभमन गिल यांनी नोंदवले असे ६ विक्रम, ज्यांनी भल्याभल्या दिग्गजांना टाकले मागे

रोहित ८५ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकार खेचून १०१ धावांवर त्रिफळाचीत  झाला. त्यानंतर शुभमन ७८ चेंडूंत १३ चौकार व ५ षटकारांसह ११२ धावांवर ब्लेअर टिकनरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. इशान व विराट यांनी ३८ धावांची भागीदारी केली. इशान १७ धावांवर रन आऊट झाला, पाठोपाठ विराट ३६ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव ( १४) व वॉशिंग्टन सुंदर ( ९) हेही माघारी परतले. ० बाद २१२ वरून भारताची अवस्था ६ बाद ३१३ अशी झाली. हार्दिक पांड्या व शार्दूल ठाकूर यांनी ३४ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. शार्दूल १७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह २५ धावांवर माघारी परतला. हार्दिक ३८ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर बाद झाला. किवी गोलंदाज जेकब डफीने १० षटकांत १०० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. भारताने ९ बाद ३८५ धावा केल्या. 

फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर न्यूझीलंडकडूनही जबरदस्त खेळ होईल अशी अपेक्षा होती, परंतु हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात फिन अ‌ॅलनला माघारी पाठवले. डेव्हॉन कॉनवे व हेन्री निकोल्स यांनी १०६ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडचा डाव रुळावर आणला. पण, कुलदीप यादपने निकोल्सला ( ४२) पायचीत करून ही जोडी तोडली. कॉनने एकाकी झुंज देत राहिला आणि त्याने ७१ चेंडूत शतक पूर्ण केले. कॉनवे व  डॅरील मिचेल यांची ७८ धावांची सेट झालेली जोडी शार्दूल ठाकूरने अनपेक्षित बाऊन्सर टाकून तोडली. मिचेलला २४ धावांवर माघारी जावे लागले. शार्दूलने पुढच्याच चेंडूवर किवी कर्णधार टॉम लॅथमला ( ०) माघारी पाठवून मॅच फिरवली. पण, याच षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूवर शार्दूलने चौकार दिले अन् रोहित रागावला. त्याला षटक संपल्यानंतर बडबडताना दिसला. 


 



 पुढच्याच षटकात शार्दूलने चतुराईने गोलंदाजी करताना ग्लेन फिलिप्सला ( ५) विराट कोहलीच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. न्यूझीलंडचा निम्मा संघ २०० धावांवर परतला माघारी.


 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs NZ, 3rd ODI Live : Shardul Thakur gets 3rd wicket in the last 9 balls, New Zealand 5 down now, but he gave two 4s in last two ball, rohit sharma angry, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.