India vs New Zealand, 3rd ODI Live : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) या दोघांनी ज्या प्रकारे सुरुवात केली, ती पाहून न्यूझीलंडकडूनही पलटवार अपेक्षित होता. हार्दिक पांड्याने पहिल्या षटकात किवींना धक्का दिल्यानंतर डेव्हॉन कॉनवेने शतक झळकावून भारतीयांचे टेंशन वाढवले होते. पण, शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) सलग दोन चेंडूंत धक्के दिले अन् चेहऱ्यावरचे हसू परतले. पण, रोहित शर्माने त्याला झापले.
रोहित शर्मा-शुभमन गिल यांनी नोंदवले असे ६ विक्रम, ज्यांनी भल्याभल्या दिग्गजांना टाकले मागे
रोहित ८५ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकार खेचून १०१ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर शुभमन ७८ चेंडूंत १३ चौकार व ५ षटकारांसह ११२ धावांवर ब्लेअर टिकनरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. इशान व विराट यांनी ३८ धावांची भागीदारी केली. इशान १७ धावांवर रन आऊट झाला, पाठोपाठ विराट ३६ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव ( १४) व वॉशिंग्टन सुंदर ( ९) हेही माघारी परतले. ० बाद २१२ वरून भारताची अवस्था ६ बाद ३१३ अशी झाली. हार्दिक पांड्या व शार्दूल ठाकूर यांनी ३४ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. शार्दूल १७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह २५ धावांवर माघारी परतला. हार्दिक ३८ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर बाद झाला. किवी गोलंदाज जेकब डफीने १० षटकांत १०० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. भारताने ९ बाद ३८५ धावा केल्या.
फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर न्यूझीलंडकडूनही जबरदस्त खेळ होईल अशी अपेक्षा होती, परंतु हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात फिन अॅलनला माघारी पाठवले. डेव्हॉन कॉनवे व हेन्री निकोल्स यांनी १०६ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडचा डाव रुळावर आणला. पण, कुलदीप यादपने निकोल्सला ( ४२) पायचीत करून ही जोडी तोडली. कॉनने एकाकी झुंज देत राहिला आणि त्याने ७१ चेंडूत शतक पूर्ण केले. कॉनवे व डॅरील मिचेल यांची ७८ धावांची सेट झालेली जोडी शार्दूल ठाकूरने अनपेक्षित बाऊन्सर टाकून तोडली. मिचेलला २४ धावांवर माघारी जावे लागले. शार्दूलने पुढच्याच चेंडूवर किवी कर्णधार टॉम लॅथमला ( ०) माघारी पाठवून मॅच फिरवली. पण, याच षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूवर शार्दूलने चौकार दिले अन् रोहित रागावला. त्याला षटक संपल्यानंतर बडबडताना दिसला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"