IND vs NZ, 3rd ODI Live : २० चेंडूंत ९६ धावा चोपून डेव्हॉन कॉनवेनं वाढवलेलं भारताचं टेंशन, उम्रान मलिक आला अन्... Video 

India vs New Zealand, 3rd ODI Live : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) या दोघांनी ज्या प्रकारे सुरुवात केली, ती पाहून न्यूझीलंडकडूनही पलटवार अपेक्षित होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 08:27 PM2023-01-24T20:27:28+5:302023-01-24T20:28:24+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 3rd ODI Live : Umran Malik gets the big breajthrough; terrific innings from Devon Conway ends on 138 in just 100 balls with 12 fours and 8 sixes, Video  | IND vs NZ, 3rd ODI Live : २० चेंडूंत ९६ धावा चोपून डेव्हॉन कॉनवेनं वाढवलेलं भारताचं टेंशन, उम्रान मलिक आला अन्... Video 

IND vs NZ, 3rd ODI Live : २० चेंडूंत ९६ धावा चोपून डेव्हॉन कॉनवेनं वाढवलेलं भारताचं टेंशन, उम्रान मलिक आला अन्... Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 3rd ODI Live : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) या दोघांनी ज्या प्रकारे सुरुवात केली, ती पाहून न्यूझीलंडकडूनही पलटवार अपेक्षित होता. हार्दिक पांड्याने पहिल्या षटकात किवींना धक्का दिल्यानंतर डेव्हॉन कॉनवेने शतक झळकावून भारतीयांचे टेंशन वाढवले होते. पण, शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) सलग दोन चेंडूंत धक्के दिले अन् चेहऱ्यावरचे हसू परतले. मात्र, डेव्हॉन कॉनवे खेळपट्टीवर खिंड लढवत होता अन् भारतीय संघ अजूनही तणावात होता. उम्रान मलिकने ( Umran Malik) ही विकेट मिळवून दिली.   

W,W, W! शार्दूल ठाकूरने तीन धक्के देत चेहऱ्यावर आणले हसू; पण, रोहित शर्माची खावी लागली बोलणी, Video


फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर न्यूझीलंडकडूनही जबरदस्त खेळ होईल अशी अपेक्षा होती, परंतु हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात फिन अ‌ॅलनला माघारी पाठवले. डेव्हॉन कॉनवे व हेन्री निकोल्स यांनी १०६ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडचा डाव रुळावर आणला. पण, कुलदीप यादपने निकोल्सला ( ४२) पायचीत करून ही जोडी तोडली. कॉनने एकाकी झुंज देत राहिला आणि त्याने ७१ चेंडूत शतक पूर्ण केले. कॉनवे व  डॅरील मिचेल यांची ७८ धावांची सेट झालेली जोडी शार्दूल ठाकूरने अनपेक्षित बाऊन्सर टाकून तोडली. मिचेलला २४ धावांवर माघारी जावे लागले. शार्दूलने पुढच्याच चेंडूवर किवी कर्णधार टॉम लॅथमला ( ०) माघारी पाठवून मॅच फिरवली. 


पुढच्याच षटकात शार्दूलने चतुराईने गोलंदाजी करताना ग्लेन फिलिप्सला ( ५) विराट कोहलीच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. न्यूझीलंडचा निम्मा संघ २०० धावांवर परतला माघारी. शार्दूलची ही वन डे तील पन्नासावी विकेट ठरली. कॉनवे मैदानावर असल्याने भारतीय चाहत्यांच्या मनात धाकधूक सुरू होतीच. किवींना अखेरच्या २० षटकांत ९ च्या सरासरीने धावा करायच्या होत्या आणि आताच्या क्रिकेटमध्ये हे अशक्य अजिबात नव्हते. पण, उम्रान मलिकने किवींसाठी ते अशक्य बनवले. उम्रानच्या वेगवान चेंडूचा कॉनवेला अंदाज नाही घेता आला अन् रोहितच्या हाती त्याने झेल दिला. कॉनवे १०० चेंडूंत १२ चौकार व ८ षटकारांसह १३८ धावांवर माघारी परतला. 



 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs NZ, 3rd ODI Live : Umran Malik gets the big breajthrough; terrific innings from Devon Conway ends on 138 in just 100 balls with 12 fours and 8 sixes, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.