India vs New Zealand, 3rd ODI Live : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) या दोघांनी ज्या प्रकारे सुरुवात केली, ती पाहून न्यूझीलंडकडूनही पलटवार अपेक्षित होता. हार्दिक पांड्याने पहिल्या षटकात किवींना धक्का दिल्यानंतर डेव्हॉन कॉनवेने शतक झळकावून भारतीयांचे टेंशन वाढवले होते. पण, शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) सलग दोन चेंडूंत धक्के दिले अन् चेहऱ्यावरचे हसू परतले. मात्र, डेव्हॉन कॉनवे खेळपट्टीवर खिंड लढवत होता अन् भारतीय संघ अजूनही तणावात होता. उम्रान मलिकने ( Umran Malik) ही विकेट मिळवून दिली.
W,W, W! शार्दूल ठाकूरने तीन धक्के देत चेहऱ्यावर आणले हसू; पण, रोहित शर्माची खावी लागली बोलणी, Video
फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर न्यूझीलंडकडूनही जबरदस्त खेळ होईल अशी अपेक्षा होती, परंतु हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात फिन अॅलनला माघारी पाठवले. डेव्हॉन कॉनवे व हेन्री निकोल्स यांनी १०६ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडचा डाव रुळावर आणला. पण, कुलदीप यादपने निकोल्सला ( ४२) पायचीत करून ही जोडी तोडली. कॉनने एकाकी झुंज देत राहिला आणि त्याने ७१ चेंडूत शतक पूर्ण केले. कॉनवे व डॅरील मिचेल यांची ७८ धावांची सेट झालेली जोडी शार्दूल ठाकूरने अनपेक्षित बाऊन्सर टाकून तोडली. मिचेलला २४ धावांवर माघारी जावे लागले. शार्दूलने पुढच्याच चेंडूवर किवी कर्णधार टॉम लॅथमला ( ०) माघारी पाठवून मॅच फिरवली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"