Join us  

IND vs NZ 3rd ODI : Rishabh Pant चा उर्मटपणा! हर्षा भोगले यांच्या प्रश्नावर खवळला; म्हणाला... Video 

India vs New Zealand 3rd ODI : १०, १५, ११, ६ न्यूझीलंड दौऱ्यावरील रिषभ पंतची कामगिरी... ट्वेंटी-२० वर्ल्ड स्पर्धेतील अपयशानंतर टीम इंडिया वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 11:05 AM

Open in App

India vs New Zealand 3rd ODI : १०, १५, ११, ६ न्यूझीलंड दौऱ्यावरील रिषभ पंतची कामगिरी... ट्वेंटी-२० वर्ल्ड स्पर्धेतील अपयशानंतर टीम इंडिया वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला लागली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु या युवांमध्ये रिषभ हे नाव सातत्याने दिसतेय आणि तितकंच सातत्य त्याने अपयशी खेळी करण्यात राखले आहे. किवी दौऱ्यावरील पहिल्या वन डे सामन्यात संजू सॅमसनने ३६ धावांची खेळी करताना श्रेयस अय्यरसोबत भारताचा डाव सावरला होता. पण, अतिरिक्त गोलंदाज खेळवण्यासाठी संजूला संघाबाहेर केले आणि रिषभला खेळवले. आजही तो अपयशी ठरला, परंतु सामन्याआधी त्याच्या व्हिडीओने क्रिकेट चाहते संतापले आहेत.

मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला आज मालिका वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. भारताचा संपूर्ण संघ २१९ धावांत तंबूत परतला आहे. श्रेयस अय्यरने सातत्य राखताना ४९ धावा केल्या, तर वॉशिंग्टन सुंदरनेही दमदार ५१ धावा चोपल्या. रिषभ मात्र १६ चेंडूंत १० धावांवर माघारी परतला. अन् त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात ज्येष्ठ समालोचक हर्षा भोगले यांच्याशी तो संवाद साधताना दिसतोय आणि त्यातून त्याचा उर्मटपणाही दिसला. 

हर्षा भोगले यांनी त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील फॉर्माविषयी विचारले आणि त्यावर रिषभ भडकला. तो म्हणाला,''मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील माझा रेकॉर्ड खराब नाही. ट्वेंटी-२०तील एखाद्यावेळेस मी मान्य करतो. त्यामुळे तुलना करण्याची गरज नाही. मी आता २५ वर्षांचा आहे, तुलनाच करायची आहे, तर मी जेव्हा तीशी पार करेन तेव्हा करा. ''

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरिषभ पंत
Open in App