IND vs NZ 3rd ODI : Sanju Samson ला संधी नाहीच... संपूर्ण मालिकेत १ मॅच खेळवली; बघा आज कोणती Plying XI उतरवली

IND vs NZ 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ख्राईस्टचर्च येथील तिसऱ्या वन डेतही पावसाने खोडा घातला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 07:03 AM2022-11-30T07:03:16+5:302022-11-30T07:09:28+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ 3rd ODI : NZ won the toss and chose to bowl first, Same lineup as the last ODI, No Sanju Samson again in team India Playing XI | IND vs NZ 3rd ODI : Sanju Samson ला संधी नाहीच... संपूर्ण मालिकेत १ मॅच खेळवली; बघा आज कोणती Plying XI उतरवली

IND vs NZ 3rd ODI : Sanju Samson ला संधी नाहीच... संपूर्ण मालिकेत १ मॅच खेळवली; बघा आज कोणती Plying XI उतरवली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs NZ 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ख्राईस्टचर्च येथील तिसऱ्या वन डेतही पावसाने खोडा घातला. पहिल्या सामन्यात विजय मिळवून किवींनी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसरी लढत पावसामुळे रद्द करावी लागली आणि आयसीसी क्रमवारीत टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या स्थानी घसरली. आज भारतीय संघासमोर मालिके वाचवण्याच्या आव्हानासोबतच क्रमावारीत सुधारणा करण्याचे लक्ष्य भारतासमोर आहे. आजच्या सामन्यात तरी संजू सॅमसनला (  Sanju Samson) संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती, परंतु ती  अपेक्षाच राहिली. न्यूझीलंडने  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 

कमाल आहे! अपयशी रिषभ पंतला संधीवर संधी, ३६ धावा करूनही संजू सॅमसनवर फुल्ली; कारण काय तर... 


संजूला ट्वेंटी-२० मालिकेत संधी न दिल्यानंतर टीम इंडियाने पहिल्या वन डेत त्याला खेळवले. रिषभ पंत व सूर्यकुमार यादव त्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर संजूने श्रेयस अय्यरसोबत टीम इंडियाचा डाव सावरला आणि तीनशेपार धावा पोहोचवल्या. पण, भारताला सामना गमवावा लागला. अतिरिक्त गोलंदाज खेळवण्यासाठी संजूला दुसऱ्या वन डेतून बाहेर बसवले आणि दीपक हुडाला संधी दिली. तिसऱ्या वन डेतही भारताने संघात कोणताच बदल केलेला नाही. 

Web Title: IND vs NZ 3rd ODI : NZ won the toss and chose to bowl first, Same lineup as the last ODI, No Sanju Samson again in team India Playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.