IND vs NZ 3rd T20I Live : पृथ्वी शॉला तिसऱ्या ट्वेंटी-२०त प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार? हार्दिक पांड्या 'या' खेळाडूला बाहेर बसवणार 

India vs New Zealand 3rd T20I : India Playing XI - भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात बुधवारी शेवटचा आणि निर्णायक ट्वेंटी-२० सामना खेळवला जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 12:56 PM2023-01-31T12:56:17+5:302023-01-31T12:56:50+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ 3rd T20I : India Playing XI, The attacking Indian opener Prithvi Shaw is set to end his international cricket exile in Ahmedabad | IND vs NZ 3rd T20I Live : पृथ्वी शॉला तिसऱ्या ट्वेंटी-२०त प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार? हार्दिक पांड्या 'या' खेळाडूला बाहेर बसवणार 

IND vs NZ 3rd T20I Live : पृथ्वी शॉला तिसऱ्या ट्वेंटी-२०त प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार? हार्दिक पांड्या 'या' खेळाडूला बाहेर बसवणार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand 3rd T20I : India Playing XI - भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात बुधवारी शेवटचा आणि निर्णायक ट्वेंटी-२० सामना खेळवला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता हा सामना खेळवला जाईल. त्याचबरोबर या सामन्याबाबत सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, पृथ्वी शॉला संधी मिळेल का? बऱ्याच कालावधीनंतर संघात स्थान मिळूनही तो बाहेरच बसला आहे. मात्र यावेळी शुभमन गिलच्या जागी पृथ्वीला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पृथ्वी शॉला संधी मिळेल का?
टीम इंडियाचे सलामीवीर शुभमन गिल आणि इशान किशन हे आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरले आहेत. गिलने वन डे मालिकेत चमकदार कामगिरी केली होती, परंतु ट्वेंटी-२० मध्ये त्याला अपयश आले. त्यामुळे या दोन युवा फलंदाजांपैकी एकाला तिसऱ्या ट्वेंटी-२०मध्ये बाहेर बसावे लागले तर पृथ्वीला संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे. यासोबतच कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना संघात स्थान देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

भारतीय संघात चार फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन पूर्णवेळ लेगस्पिनर्सना संधी मिळाली. पण यावेळी अहमदाबादच्या खेळपट्टीनुसार हे समीकरण बदलू शकते. सर्व फॉरमॅटमध्ये खेळल्या गेलेल्या गेल्या तीन सामन्यांमध्ये अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल होती. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते भारताने खेळलेल्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये खेळपट्टीला दोष देणे चुकीचे ठरेल. पण सलामीच्या दोन्ही फलंदाजांच्या कामगिरीकडे पाहण्याची गरज आहे.

  • शुभमन गिलची मागील पाच ट्वेंटी-२० सामन्यांमधील कामगिरी - ७,५,४६,७,११  
  • इशान किशनची मागील पाच ट्वेंटी-२० सामन्यांमधील कामगिरी  - ३७, २,१,४,१९ 

 

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल/पृथ्वी शॉ
इशान किशन (यष्टीरक्षक)/जितेश शर्मा
राहुल त्रिपाठी
सूर्यकुमार यादव
हार्दिक पंड्या (कर्णधार)
दीपक हुडा
वॉशिंग्टन सुंदर
शिवम मावी
कुलदीप यादव
युजवेंद्र चहल/उम्रान मलिक
अर्शदीप सिंग
 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs NZ 3rd T20I : India Playing XI, The attacking Indian opener Prithvi Shaw is set to end his international cricket exile in Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.