Join us  

IND vs NZ, 3rd T20I : इशान किशननं केला भारी रन आऊट; पण चर्चेत आली राहुल द्रविडची कृती, जिंकली मनं, पाहा Video 

इशान किशननं किवी कर्णधार मिचेल सँटनरला धावबाद केले आणि त्यानंतर डग आऊटमध्ये बसलेल्या राहुल द्रविडनं असं काही केलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 11:55 PM

Open in App

India vs New Zealand, 3rd T20I Live Update : राहुल द्रविड याच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या व  रोहित शर्माच्या  फुल टाईम नेतृत्वाखालील पहिल्या ट्वेंटी-२० मालिकेत टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला. रोहितचे अर्धशतक आणि अन्य फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर टीम इंडियानं ७ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला अन् प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १११ धावांवर माघारी परतला. भारतानं ७३ धावांनी हा सामना जिंकून मालिका ३-० अशी खिशात घातली. 

प्रथम फलंदाजी करताना रोहित- इशान किशन या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ६९ धावा चोपल्या. पण, मिचेल सँटनरच्या एका षटकात किशन ( २९) व  सूर्यकुमार यादव ( ०) माघारी परतले. सँटनरनं पुढच्या षटकात रिषभ पंतलाही ( ४) माघारी पाठवले. रोहितनं दमदार खेळी करताना ३१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावा केल्या. वेंकटेश अय्यर ( २०) व श्रेयस अय्यर ( २५) यांनी चांगला खेळ केला. हर्षल पटेलनं १८ धावा केल्या. दीपक चहरनं ८ चेंडूंत २१ धावा चोपूलन भारताला ७ बाद १८४ धावांचा पल्ला गाठून दिला. त्यानं अखेरच्या षटकात १९ धावा कुटल्या. 

प्रत्युत्तरात  न्यूझीलंडकडून मार्टीन गुप्तील ( ५१) वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. अक्षर पटेलनं ९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलनं दोन, तर दीपक चहर, युझवेंद्र चहर व वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १७.२ षटकांत १११ धावांवर माघारी परतला. इशान किशननं ( ishan kishan) किवी कर्णधार मिचेल सँटनरला धावबाद केले आणि त्यानंतर डग आऊटमध्ये बसलेल्या राहुल द्रविडनं टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांची पाठ थोपटली. 

इशान किशननं केला भारी रन आऊट, Video  

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडराहूल द्रविडइशान किशन
Open in App