IND vs NZ, 3rd T20I Live : १९ चेंडूंत ९० धावा! शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम, न्यूझीलंडविरुद्ध २३४ धावांचा डोंगर 

India vs New Zealand, 3rd T20I Live : भारतीय फलंदाजांनी निर्णायक ट्वेंटी-20 सामन्यात कहर केला...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 08:45 PM2023-02-01T20:45:03+5:302023-02-01T20:45:19+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 3rd T20I Live : Shubman Gill becomes the youngest player in history to register a century in all the 3 formats, India post 234/4. | IND vs NZ, 3rd T20I Live : १९ चेंडूंत ९० धावा! शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम, न्यूझीलंडविरुद्ध २३४ धावांचा डोंगर 

IND vs NZ, 3rd T20I Live : १९ चेंडूंत ९० धावा! शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम, न्यूझीलंडविरुद्ध २३४ धावांचा डोंगर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 3rd T20I Live : भारतीय फलंदाजांनी निर्णायक ट्वेंटी-20 सामन्यात कहर केला... शुभमन गिलने ट्वेंटी-20तील पहिले शतक झळकावताना मोठ्या विक्रमाची नोंद केली. राहुल त्रिपाठी, हार्दिक पांड्या व सूर्यकुमार यांनीही चौफेर फटकेबाजी केली. वन डे मालिका गाजवल्यानंतर शुभमनने ट्वेंटी-२०तही न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धू धू धुतले... 

 10 चौकार, 6 षटकार! शुभमन गिलचे खणखणीत शतक; एक वेगळा पराक्रम नोंदवणारा पाचवा भारतीय ठरला



मायकेल ब्रेसवेलने दुसऱ्याच षटकात भारताला धक्का दिला. इशान किशन पायचीत झाला. राहुल त्रिपाठी व शुभमन यांनी चांगली फटकेबाजी करून ४२ चेंडूंतील ८० धावांची भागीदारी केली. शुभमनला ३४ धावांवर जीवदान मिळाले. राहुल २२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावांवर माघारी परतला. सूर्यकुमार यादव मैदानावर येताच स्टेडियम दणाणून निघाले. सूर्यानेही त्याचा फॉर्म दाखवताना सुरेख फटके मारले. पण, २४ धावांवर ब्रेसवेलने त्याचा अप्रतिम झेल टिपला. सूर्या व गिलने २५ चेंडूंत ३८ धावा जोडल्या. शुभमन आज किवी गोलंदाजांना जुमानत नव्हता. १६व्या षटकात त्याने डिप स्क्वेअर लेगला दोन सलग षटकार खेचले. शुभमनने हार्दिक पांड्यासह २२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. गिलने ५४ चेंडूंत ट्वेंटी-२०तील शतक पूर्ण केले. 


कसोटी, वन डे व ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शतक किमान एक शतक झळकाणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला. सुरेश रैना, रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली यांनी हा पराक्रम केला आहे.  दीपक हुडा व सूर्यकुमार यांनी ट्वेंटी-२०त शतक झळकावले आहे. हार्दिक १७ चेंडूंत ३० धावा करून माघारी परतला.  शुभमन १२ चौकार व  ७ षटकारांसह १२६ धावांवर नाबाद राहिला अन् भारताने ४ बाद २३४ धावा केल्या. ट्वेंटी-२० त भारताकडून सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विराट कोहलीचा ( १२२ ) विक्रम शुभमनने मोडला. 

Web Title: IND vs NZ, 3rd T20I Live : Shubman Gill becomes the youngest player in history to register a century in all the 3 formats, India post 234/4.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.