IND vs NZ, 3rd T20I Live : ॲक्शन रिप्ले! सूर्यकुमार यादवच्या दोन अफलातून झेलने 'गेम' झाला, किवींचा निम्मा संघ २१ धावांत तंबूत, Video 

India vs New Zealand, 3rd T20I Live : भारतीय फलंदाजांनी आज निर्णायक ट्वेंटी-20 सामन्यात दमदार फटकेबाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 09:33 PM2023-02-01T21:33:48+5:302023-02-01T21:39:11+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 3rd T20I Live :  Suryakumar Yadav has taken 2 similar catches at slips - excellent catch, New Zealand 21 for 5, Video | IND vs NZ, 3rd T20I Live : ॲक्शन रिप्ले! सूर्यकुमार यादवच्या दोन अफलातून झेलने 'गेम' झाला, किवींचा निम्मा संघ २१ धावांत तंबूत, Video 

IND vs NZ, 3rd T20I Live : ॲक्शन रिप्ले! सूर्यकुमार यादवच्या दोन अफलातून झेलने 'गेम' झाला, किवींचा निम्मा संघ २१ धावांत तंबूत, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 3rd T20I Live : भारतीय फलंदाजांनी आज निर्णायक ट्वेंटी-20 सामन्यात दमदार फटकेबाजी केली. शुभमन गिलने ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावताना मोठ्या विक्रमाची नोंद केली. भारताने ४ बाद २३४ धावांचा डोंगर उभा केला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून ही पाचवी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा निम्मा संघ २१ धावांत तंबूत परतला आहे. सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav Catch) दोन अफलातून झेल घेत किवींना धक्का दिला. 

 शुभमन गिलच्या नाबाद १२६ धावांनी मोडले ४ मोठे विक्रम; विराट, रैनाला मागे टाकले


शुभमन गिलने १२ चौकार व  ७ षटकारांसह १२६ धावांवर नाबाद राहिला. ट्वेंटी-२० त भारताकडून सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विराट कोहलीचा ( १२२ वि. अफगाणिस्तान, २०२२ ) विक्रम शुभमनने मोडला. कसोटी, वन डे व ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शतक किमान एक शतक झळकाणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात युवा वयात शतक झळकाण्याचा विक्रमही शुभमनने नावावर केला. तो २३ वर्ष व१४६ दिवसांचा आहे आणि त्याने सुरेश रैनाचा ( २३  वर्ष व १५६ दिवस) विक्रम मोडला.

राहुल त्रिपाठी व शुभमन यांनी चांगली फटकेबाजी करून ४२ चेंडूंतील ८० धावांची भागीदारी केली.  राहुल २२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावांवर माघारी परतला. सूर्यकुमार यादव २४ धावांवर बाद झाला. सूर्या व गिलने २५ चेंडूंत ३८ धावा जोडल्या.  हार्दिक १७ चेंडूंत ३० धावा करून माघारी परतला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडची सुरुवात अत्यंत वाईट झाली. हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात फिन अॅलनला बाद केले. सूर्यकुमारने स्लीपमध्ये अप्रतिम झेल घेतला. त्यानंतर पुढच्याच षटकात अर्शदीप सिंगने दोन धक्के दिले. डेव्हॉन कॉनवे व मार्क चॅम्पमन माघारी परतले. हार्दिकने तिसऱ्या षटकात ग्लेन फिलिप्सचा अथथळा दूर करताना भारताला मोठे यश मिळवून दिले. सूर्याने तशाच पद्धतीने विकेट घेतली. उम्रान मलिकने मायकेल ब्रेकवेलला बाद करून किवींचा निम्मा संघ २१ धावांवर माघारी पाठवला. 


सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs NZ, 3rd T20I Live :  Suryakumar Yadav has taken 2 similar catches at slips - excellent catch, New Zealand 21 for 5, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.