India vs New Zealand, 3rd T20I Live Update : फुल टाईम कर्णधार म्हणून रोहित शर्मानं ( Rohit Sharma) पहिलीच ट्वेंटी-२० मालिका गाजवली. त्यानं स्वतः जबाबदारीनं खेळ करताना मालिकेत सर्वाधिक धावा कुटल्या, पण सहकाऱ्यांनाही प्रोत्साहन देत चांगली कामगिरी करून घेतली. रोहितनं तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत ५३च्या सरासरीनं १५९ धावा केल्या. त्यानं आजच्या लढतीत ३१ चेंडूंत ५६ धावांची खेळी केली. त्याआधी पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे ४८ ( ३६ चेंडू) व ५५ ( ३६ चेंडू) धावा केल्या. इडन गार्डनवरीर त्याचा झंझावात इश सोढीनं ( Ish Sodhi) रोखला अन् तोही भन्नाट कॅच घेऊन...
टीम इंडियानं कर्णधार बदलला अन् नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूनं लागू लागला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत याच नाणेफेकीनं टीम इंडियाचा घात केला होता. त्यानंतर रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत टीम इंडियानं तिन्ही सामन्यात नाणेफेक जिंकली. मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर रोहितनं तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान स्वीकारले. लोकेश राहुलला विश्रांती दिल्यानं रोहितसह इशान किशन सलामीला आला आणि दोघांनी इडन गार्डनवर धुरळा उडवला. या जोडीनं पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना ६९ धावा चोपल्या. रोहित व इशान यांनी मैदानाच्या कानाकोपऱ्याच चेंडू टोलवला.
रोहितनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १५० षटकारांचा पल्लाही ओलांडला. न्यूझीलंडच्या मार्टीन गुप्तीलनंतर असा पराक्रम करणारा रोहित जगातला दुसरा फलंदाज ठरला. सातव्या षटकात ही जोडी तुटली. प्रभारी कर्णधार मिचेल सँटनरनं टीम इंडियाला पहिला धक्का देताना इशानला बाद केले. इशाननं २९ धावा केल्या. त्याच षटकात सूर्यकुमार यादवही ( ०) माघारी परतला. सँटनरनं त्याच्या पुढच्या षटकात रिषभ पंतलाही ( ४) माघारी पाठवून टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. पटापट तीन फलंदाज बाद झाल्यानं रोहितनंही सावध पवित्रा घेतला. भारताच्या १० षटकांत ३ बाद ९० धावा झाल्या होत्या. ७-१० षटकांत भारतानं २१ धावांत ३ फलंदाज गमावले.
रोहितनं २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्याचे हे ट्वेंटी-२०तील ३०वे अर्धशतक ठरले आणि आता आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक ५०+ धावा करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. त्यानं विराट कोहलीचा २९ अर्धशतकांचा विक्रम मोडला. पण, इश सोढीनं १२व्या षटकात भन्नाट रिटर्न कॅच घेताना रोहितचा झंझावात रोखला. हिटमॅन ३१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावा केल्या.
Web Title: IND vs NZ, 3rd T20I Live Update : Rohit Sharma departs immediately after bringing up his fifty as Sodhi takes a sharp reflex catch, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.