भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात नाणेफेकीचा कौल यजमानांच्या बाजूनं लागला. केन विलियम्सननं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेताना टीम इंडिला फलंदाजीचे निमंत्रण दिले. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी वादळी खेळी करताना पहिल्या विकेटसाठी 89 धावांची सलामी दिली. हे दोघेही माघारी परतल्यानंतर टीम इंडियाच्या धावांच्या सरासरीचा वेग थोडासा संथ झाला. पण, अखेरच्या षटकात त्याची भरपाई केली.
पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या
रोहित शर्मानं आज दमदार फटकेबाजी केली. त्यानं
लोकेश राहुलसह पहिल्या विकेटसाठी 5.3 षटकांतच अर्धशतकी भागीदारी केली. पॉवरप्लेमध्ये अर्धशतक झळकावणारा रोहित हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी शिखर धवननं 48 धावा केल्या होत्या. लोकेश 27 धावा करून माघारी परतला.
विराट कोहलीन तिसऱ्या क्रमांकावर शिवम दुबेला पाठवले. रोहित 40 चेंडूंत 65 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 6 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. दुबेही ( 3) धावांवर बाद झाला. हॅमिश बेन्नेटनं एकाच षटकात या दोघांना माघारी पाठवले.
विराट व श्रेयस अय्यर यांनी किवी गोलंदाजांचा समाचार घेतला. श्रेयस 17 धावांवर माघारी परतला. विराटनं 25वी धाव घेताच आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. टीम इंडियाकडून ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधाराचा मान कोहलीनं पटकावला. त्यानं महेंद्रसिंग धोनीला ( 1112) मागे टाकले. या विक्रमात दक्षिण आफ्रिकेचा फॅफ ड्यु प्लेसिस ( 1273) आणि केन विलियम्सन ( 1134) आघाडीवर आहेत. बेन्नेटनं 19व्या षटकात कोहलीला बाद केले. त्यानं 27 चेंडूंत 38 धावा केल्या. भारतानं 20 षटकांत 5 बाद 179 धावा केल्या.
IND Vs NZ, 3rd T20I : विराट कोहलीनं 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, ठरला टीम इंडियाचा अव्वल कर्णधार
IND Vs NZ, 3rd T20I : रोहित शर्माची 'पॉवर'; केला कोणत्याच भारतीयाला न जमलेला पराक्रम
IND Vs NZ, 3rd T20I : रोहित शर्मा दस हजारी मनसबदार; हा शिखर सर करणारा चौथा भारतीय
... तर आशिया कप खेळणार नाही, पाकच्या इशाऱ्याला बीसीसीआयचे जशासतसे उत्तर
IND Vs NZ : नवदीप सैनीसाठी शार्दूल ठाकूर त्याग करणार? आज टीम इंडियात हे अंतिम शिलेदार खेळणार?
U19WC: कामगाराच्या मुलाची कमाल, टीम इंडियाच्या विजयाच उचलला सिंहाचा वाटा
नीरज चोप्राची अभिमानास्पद कामगिरी; दुखापतीतून सावरला अन् पटकावलं 2020 ऑलिम्पिक तिकीट
Breaking : सायना नेहवालचा भाजपात प्रवेश
Web Title: IND Vs NZ, 3rd T20I: Rohit's stunning 50, Pandey, Jadeja's finish help India post 179/5
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.