IND vs NZ Test : या लोकांना वानखेडे स्टेडियमवर मोफत कसोटी सामना पाहता येणार; MCA ची घोषणा

सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 03:37 PM2024-10-16T15:37:15+5:302024-10-16T15:37:48+5:30

whatsapp join usJoin us
ind vs nz 3rd test match BMC schools to get free tickets for Mumbai Test, read here details  | IND vs NZ Test : या लोकांना वानखेडे स्टेडियमवर मोफत कसोटी सामना पाहता येणार; MCA ची घोषणा

IND vs NZ Test : या लोकांना वानखेडे स्टेडियमवर मोफत कसोटी सामना पाहता येणार; MCA ची घोषणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs NZ 3rd Test : सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. आजपासून बंगळुरू येथून सलामीच्या सामन्याला सुरुवात झाली. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे आज खेळ होऊ शकला नाही. या मालिकेतील तिसरा अर्थात अखेरचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडिमयवर खेळवला जाईल. १ ते ५ नोव्हेंबरदरम्यान ही लढत पार पडेल. हा सामना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) शाळांतील मुलांना मोफत पाहता येईल. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या Apex Council ने एकमताने सहमती दर्शवली. (BMC schools to get free tickets for 3rd test) 

न्यूझीलंडची 'कसोटी'
बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजय मिळवलेल्या टीम इंडियाची तुल्यबळ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू झाली आहे. मालिकेतील पहिला सामना बंगळुरुच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. मालिकेतील दुसरा सामना २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पुण्याला तर तिसरा सामना १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारताने जरी बांगलादेशला पराभूत केले असले तरी न्यूझीलंड संघाला मात्र गेल्या दीड-दोन महिन्यात फारशी चांगली कामगिरी जमलेली नाही. अफगाणिस्तानविरूद्धचा न्यूझीलंडचा कसोटी सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर श्रीलंकेविरूद्ध न्यूझीलंडला २-०ने कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे या मालिकेच्या माध्यमातून ते दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतील. 

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया - 
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.

राखीव खेळाडू - हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मयंक यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.

IND vs NZ कसोटी मालिकेचे वेळापत्रक - 
पहिला कसोटी सामना - १६ ते २० ऑक्टोबर, २०२४ - बंगळुरु 
दुसरा कसोटी सामना - २४ ते २८ ऑक्टोबर, २०२४ -  पुणे
तिसरा कसोटी सामना - ०१ ते ५ नोव्हेंबर, २०२४ - मुंबई

Web Title: ind vs nz 3rd test match BMC schools to get free tickets for Mumbai Test, read here details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.