IND vs NZ 3rd Test Match Live Updates | मुंबई : रवींंद्र जडेजाने शानदार पुनरागमन करत पाच बळी घेऊन टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. यासह जड्डूने एका नवीन विक्रमाला गवसणी घातली. तिसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ६५.४ षटकांत सर्वबाद २३५ धावा केल्या. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकी गोलंदाजांनी किवी फलंदाजांची कोंडी केली. जडेजाच्या फिरकीतील जादू आणि वॉशिंग्टनच्या सुंदर गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला. जड्डूने १४व्या वेळी पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याचा खास पराक्रम करून दाखवला. दुसऱ्या बाजूला वॉशिंग्टन सुंदरने ४ बळी घेतले, तर आकाश दीपला दोन बळी घेण्यात यश आले.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजाने पाचवा क्रमांक गाठला. त्याने झहीर खान आणि इशांत शर्मा यांना मागे टाकले. त्याने आतापर्यंत एकूण ३१४ बळी घेतले आहेत. तर अनिल कुंबळे ६१९ बळींसह अव्वल स्थानी आहेत. सक्रिय खेळाडूंपैकी केवळ आर अश्विन (५३३ बळी) या यादीत जडेजाच्या पुढे आहे.
कसोटीमध्ये सर्वाधिक बळी घेणारे भारतीय -अनिल कुंबळे - ६१९ बळीआर अश्विन - ५३३* बळीकपिल देव - ४३४ बळी हरभजन सिंग - ४१७ बळीरवींद्र जडेजा - ३१४* बळीइशांत शर्मा - ३११ बळीझहीर खान - ३११ बळी
भारताचा संघ -रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टिरक्षक), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडचा संघ -टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉन्वे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, इश सोधी, मॅट हेनरी, एजाज पटेल, विल्यम ओरोरके.