Join us

Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!

विराटची बॅट हाती आल्यावर आकाशदीवरही आली रन आउटच्या रुपात विकेट गमावण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 16:08 IST

Open in App

Akash Deep borrows Virat Kohli’s bat And gets run out : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना वानखेडेच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा डाव २३५ धावांत आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव २६३ धावांत संपुष्टात आला. आकाश दीपच्या  रन आउटनं भारताचा डाव संपल्याचे पाहायला मिळाले.

विराटची बॅट आकाश दीपसाठी ठरली अनलकी

रन आउटच्या रुपात विकेट गमावण्या आधी  आकाश दिपनं ड्रेसिंग रूममधून विराट कोहलीची बॅट मागवली होती. पण ही बॅट हाती घेतल्यावर एकही चेंडू न खेळता त्याच्यावर रन आउटच्या रुपात अवघ्या काही क्षणात विराटच्या बॅटसह पुन्हा पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. त्यामुळे ही बॅट विराटनंतर आकाश दीपसाठीही अनलकी ठरली. पहिल्या दिवसाच्या खेळात विराट कोहलीही रन आउट झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्याच्यासारखीच वेळ त्याची बॅट हातात आल्यावर आकाशदीपवरही आली.

विराटच्या बॅट घेतली अन् डायमंड डकची वेळ आली

भारताच्या पहिल्या डावातील अखेरच्या विकेटसाठी आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर क्रिजवर होते. एका बाजूला वॉशिंग्टन सुंदरची अति सुंदर फटकेबाजी सुरु होती. या परिस्थितीत आकाश दीप काही वेळ साथ देईल, अशी अपेक्षा होती. आकाश दीप  आपली स्वत:ची बॅट घेऊनच मैदानात खेळण्यासाठी उतरला होता. पण त्याला विराट कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की आली.

स्ट्राइकवर येण्याआधीच त्याने विराटची बॅटही मागवली. पण रन आउटच्या रुपात एकही चेंडू न खेळता त्याच्यावर रन आउट होण्याची वेळ आली.  क्रिकेटमध्ये एकही चेंडूचा सामना न करता शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूच्या पदरी डायमंड डक आला असे म्हणतात. हीच वेळ विराटच्या बॅटच्या मोहात त्याच्या पदरी पडली. 

नेमकं काय घडलं?

भारताच्या डावातील ६० व्या षटकात अजाज पटेल गोलंदाजी करत होता. त्याच्या दुसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर असलेल्या वॉशिंग्टन सुंदरनं खणखणीत चौकार मारून आपले इरादे स्पष्ट केले. या चौकारासह भारतीय संघाकडे २८ धावांची आघाडी मिळाली. तिसरा चेंडू निर्धाव खेळल्यावर चौथ्या चेंडूवर फटका मारल्यावर वॉशिंग्टन सुंदर आणि आकाशदीपनं पहिली धाव अगदी आरामात पूर्ण केली. आकाश दीपनं दुसऱ्या धावेसाठी क्रीज सोडलं. या धावेला नकार देत वॉशिंग्टननं त्याला माघारी धाडले. आकाश दीप क्रीजमध्ये पोहचण्याआधी रचिन रविंद्रचा अचूक थ्रो टॉम ब्लंडेलच्या हातात आला होता. त्याने कोणतीही चूक न करता भारतीय आकाश दीपचा खेळ खल्लास केला. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघन्यूझीलंडविराट कोहलीआकाश दीप