Join us  

IND vs NZ : बुमराहचा भेदक मारा, टॉम लॅथमच्या पदरी भोपळा; सेटअप करून अशी घेतली विकेट (VIDEO)

नं पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यावर दुसऱ्या चेंडूवर टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिले.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 10:35 AM

Open in App

India vs New Zealand, 1st Test Jasprit Bumrah Gets First Breakthrough Removes Tom Latham Duck : बंगळुरुच्या मैदानात सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील अखेरच्या दिवसातील सुरुवातीला जसप्रीत बुमराहनं टीम इंडियाला अपेक्षेप्रमाणे सुरुवात करुन दिली आहे. न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथम याला त्याने शून्यावर माघारी धाडले. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर १०७ धावांचे आव्हान ठेवले आहे. अल्पधावसंख्येचा बचाव करून नवा इतिहास रचण्यासाठी टीम इंडियाला सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचे चॅलेंज आहे. जसप्रीत बुमरानं पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यावर दुसऱ्या चेंडूवर टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिले.  

बुमराहनं सेटअप करून किवी कॅप्टनचा खेळ केला खल्लास! 

चौथ्या दिवशीच्या खेळात भारतीय संघाचा दुसरा डाव आटोपल्यावर न्यूझीलंडच्या संघानं आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली होती. पण चार चेंडू टाकल्यावर खेळ थांबला होता. दुसऱ्या डावातील पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर  बुमराहनं आपलं षटक टाकण्यास सुरुवात केली. पाचव्या दिवसातील पहिला चेंडू निर्धाव टाकल्यावर बुमराहनं टॉम लॅथमला पायचित केले. पहिला चेंड़ू आउट स्विंग टाकून शेवटचा चेंडू जबरदस्त इनस्विंग करत बुमराहनं टॉम लॅथमला चकवा दिला.

जशी हवी तशी जबरदस्त सुरुवात झाली

पहिल्या डावात टॉम लॅथम याने फक्त १५ धावा केल्या होत्या. पण ४९ चेंडूचा सामना करत त्याने डेवॉन कॉन्वेच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली होती. यावेळी तो कुलदीप यादवच्या जाळ्यात फसला होता. दुसऱ्टा डावात अल्प टार्गेटचा पाठलाग करताना त्याला फार काळ मैदानात तग धरता आला नाही. भारतीय संघाला या सामन्यात कमबॅक करण्यासाठी जबरदस्त सुरुवात मिळणं महत्त्वाचं होते. बुमराहनं यात पुढाकार घेत संघाला चांगली सुरुवात करून देत पाहुण्या संघाला बॅकफूटवर ढकललं. दुसऱ्या बाजूला मोहम्मद सिराजही अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे भारतीय संघ ही लढाईत ट्विस्ट आणणार याचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघन्यूझीलंड