भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-२० सामना चांगलाच रंगला. या सामन्यात सर्वाधिक धावा केल्या त्या न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने. भारताच्या १८० धावांचा पाठलाग करताना विल्यमसनने दमदार फलंदाजी केली. विल्यमसन ९५ धावांवर बाद झाला. पण ९५ धावांवर बाद होऊनही या सामन्यात विल्यमसनचे शतक पाहायला मिळाले. तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसत नसेल, पण असेल घडल्याचे पाहायला मिळाले आहे...
न्यूझीलंडचा संघ हा सामना सहज जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. कारण अखेरच्या षटकात न्यूझीलंडचा जिंकायला ९ धावांची गरज होती. षटकाच्या सुरुवातीलाच एक षटकारीही आला होता. पण मोक्याच्या क्षणी विल्यमसन बाद झाला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर रॉस टेलर आऊट झाला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
सामन्याच्या ४०व्या षटकात विल्यमसन ९५ धावांवर बाद झाला, तर मग त्याने शतक कसे झळकावले , हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. न्यूझीलंडच्या डावात विल्यमसनने ९५ धावा केल्या. त्यानंतर खेळवण्यात आलेल्या सुपर ओव्हरमध्ये त्याने ११ धावा केल्या. ९५ आणि ११ धावा मिळून विल्यमसनने या सामन्यात एकूण १०६ धावा केल्याचे पाहायला मिळाले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांकडून तोडीस तोड खेळ पाहायला मिळाला. फॉर्मात परतलेल्या रोहित शर्माची फलंदाजी पाहण्यासारखी होती. त्याला लोकेश राहुल व विराट कोहली यांच्याकडून चांगली साथ मिळाली. त्या जोरावर टीम इंडियानं 5 बाद 179 धावा उभ्या केल्या. किवींच्या मार्टीन गुप्तील आणि कॉलीन मुन्रो यांनी सावध सुरुवात केली, परंतु टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्यांना माघारी पाठवून सामन्यात चुरस निर्माण केली. पण, कर्णधार केन विलियम्सननं चिवट खेळ करताना सामना किवींच्या बाजूनं झुकवला. पण, मोहम्मद शमीनं सामन्याला कलाटणी दिली. त्याच्या अव्वल गोलंदाजीमुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यात रोहितनं अखेरच्या दोन चेंडूवर षटकार खेचून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारतानं पहिल्यांदाच न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानावर ट्वेंटी-20 मालिकेत पराभूत केले. टीम इंडियानं मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.