Join us  

IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!

​​​​​​​न्यूझीलंड संघासाठी भारतीय दौरा हा नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. इथं त्यांना कमालीची कामगिरी करून दाखवण्यात नेहमीच अपयश आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 7:45 PM

Open in App
  • India vs New Zealand Test Head to Head Stats Record  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला बंगळुरुच्या मैदानात सुरुवात होणार आहे. बुधवारी १६ ऑक्टोबरपासून या दोन्ही संघातील द्विपक्षीय कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
  • भारत दौरा किवींसाठी नेहमीच राहिलाय आव्हानात्मक

न्यूझीलंड संघासाठी भारतीय दौरा हा नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. इथं त्यांना कमालीची कामगिरी करून दाखवण्यात नेहमीच अपयश आले आहे. यावेळीही भारतीय संघ त्याच अंदाजात पाहुण्यांचे स्वागत करण्याच्या तयारीत असेल. न्यूझीलंडच्या संघाला भारतीय मैदानात अद्याप एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.    

  • पहिल्या कसोटी मालिकेत झाली होती एकदम बिकट अवस्था; दोन दौऱ्यानंतर जिंकला होता पहिला सामना
  • किवी संघानं १९५५ मध्ये पहिल्यांदा भारत दौऱ्यावर ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेत संघाला २-० अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर १९६५ मध्ये न्यूझीलंडच्या संघाने ४ सामन्यातील कसोटी मालिकेत ३ सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवले. पण एक सामना गमावल्यामुळे मालिकेवर भारतीय संघाने कब्जा केला होता. पहिल्या दोन दौऱ्यानंतर १९६९ मध्ये न्यूझीलंड संघाने भारतीय मैदानात पहिला वहिला विजय नोंदवला. ३ सामन्यांच्या मालिकेतील १ सामना अनिर्णित राहिला होता. तर ही मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. 
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड द्विपक्षीय कसोटी मालिकेत कुणाची कशी राहिलीये कामगिरी?  
  • दोन्ही संघातील एकूण मालिका: १२
  • भारतीय संघ- १० विजय
  • न्यूझीलंड : खातेही नाही उघडले
  • अनिर्णित राहिलेल्या मालिका : २
  •  
  • भारतातील न्यूझीलंड संघाची कसोटी सामन्यातील कामगिरी 
  • एकूण कसोटी सामने : ३६
  • भारतीय संघाने १७ सामन्यात मिळवलाय विजय 
  • न्यूझीलंडच्या खात्यात फक्त २ विजयाची नोंद 
  • अनिर्णित: १७
  •  
  • याआधीच्या मालिकेत काय घडलं?
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अखेरची कसोटी मालिका नोव्हेंबर २०२१ मध्ये झाली होती. २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने १-० असा विजय नोंदवला होता. 
  • भारत-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील ओव्हर ऑल रेकॉर्ड
  • एकूण कसोटी मालिका : २३
  • भारतीय संघाने १२ मालिकेत सोडली छाप 
  • न्यूझीलंडच्या संघाने फक्त ७ मालिकेवरच केलाय कब्जा 
  • अनिर्णित: ४

भारत-न्यूझीलंड यांच्यातील ओव्हरऑल कसोटी सामन्यांचा रेकॉर्ड

  • एकूण कसोटी सामने : ६२
  • भारतीय संघाच्या खात्यात  २२ विजयाची नोंद
  • न्यूझीलंडच्या संघाला फक्त १३ सामन्यात नोंदवता आला विजय
  • अनिर्णित सामने: २७

 न्यूझीलंडचा भारत दौरा  

  • १६ ऑक्टोबर : पहिला कसोटी सामना, बंगळुरु
  • २४ ऑक्टोबर : दुसरा कसोटी सामना, पुणे
  • १ नोव्हेंबर : तिसरा कसोटी सामना, मुंबई 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघन्यूझीलंडरोहित शर्माविराट कोहली