Join us

"दिल तो बच्चा है जी....टीम इंडियावरील प्यार सच्चा है जी" गावसकरांनाही आवरला नाही नाचायचा मोह (VIDEO)

लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी दुबईच्या मैदानात ठेका धरत माहोल आणखी खास केल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 11:23 IST

Open in App

Sunil Gavaskars Dance Video Breaks Internet : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय संघानं न्यूझीलंडला ४ विकेट्स राखून पराभूत करत इतिहास रचला. रवींद्र जडेजानं विजयी चौकार मारला अन् दुईबतील स्टेडियमच्या ड्रेसिंग रुम पासून ते अगदी भारताच्या कानाकोपऱ्यात टीम इंडियाच्या विजयाचा माहोल तयार झाला. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं मैदानातच स्टंप हातात घेऊन दुबईच्या मैदानात मांडलेल्या दांडिया खेळापासून ते हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यरसह संघातील अन्य खेळाडूंनी सेलिब्रेशन वेळी केलेला कल्ला चर्चेचा विषय ठरत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अन् लिटल मास्टर गावसकरांनी माहोल केला आणखी खास

 यात लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी दुबईच्या मैदानात ठेका धरत माहोल आणखी खास केल्याचे पाहायला मिळाले. "दिल तो बच्चा है जी....टीम इंडियावरील प्यार सच्चा है जी" या तोऱ्यात गावसकर अगदी लहान मुलाप्रमाणे बिनधास्त नाचत भारतीय संघाच्या आनंदात सहभागी झाल्याचा सीन पाहायला मिळाला.

माजी क्रिकेटरचा आनंद गगानात मावेना! मैदानात ठेका धरला अन् मैफिल लुटली

टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेट सुनील गावसकर चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान समालोचन करताना दिसले. स्पर्धेदरम्यान त्यांनी भारतीय संघाच्या काही चुकाही दाखवून दिल्या. त्यांचे बोलणं अनेकांना खटकले. पण टीम इंडियानं फायनल बाजी मारल्यावर गावसकरांना आपला आनंद लपवता आला नाही. रोहितन ट्रॉफी उचलली अन् गावसकरांनी मैदानातच ठेका धरत मनातील भावना डान्सच्या माध्यमातून व्यक्त केल्या. गगनात मानेवा असा आनंद झाल्याचा सीन त्यांनी सादर बिनधास्त नृत्यातून पाहायला मिळाले.  गावसकरांशिवाय नवज्योतसिंग सिद्धूही हार्दिक पांड्यासोबत भांगडा करताना दिसले.

नेटकऱ्यांना भावला गावसकरांचा अंदाज

दुबईच्या मैदानात गावसकरांनी धरलेल्या ठेक्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. टीम इंडियाचा ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार झाल्यानंतर गावसकरांनी वयाच्या ७५ व्या वर्षी दाखवलेला जोश काही जणांचे होश उडवणारा तर अनेकांना भावणारा ठरतोय.  त्यांच्या या व्हिडिओवर लाईक्स अन् कमेंट्सची अक्षरश: बरसात होताना दिसतीये. 

टॅग्स :सुनील गावसकरचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माव्हायरल व्हिडिओ