Burj Khalifa Lights Up In Team Indias Colors After Champions Trophy Win : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकत फायनल बाजी मारली. भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफा इमारत भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगानी उजळल्याचे पाहायला मिळाले. रोहित सेनेने न्यूझीलंडचा २५ वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता करत दुबईचं मैदान गाजवल्यावर देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरम्यान दुबईतही टीम इंडियाच्या आनंदोत्सवाचा जबरदस्त माहोल पाहायला मिळाला. टीम इंडियाच्या विक्रमी विजयानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये दैदिप्यमान कामगिरीनंतर टीम इंडियासाठी बुर्ज खलिफा इमारतीवर तिरंग्यातील लायटिंग आणि कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह संघातील अन्य सदस्यांचे फोटोही झळकल्याचे पाहायला मिळते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नशीबानं खेळ केला टॉसचा मेळ कधीच नाही जमला, पण शेवटी कर्तृत्व जिंकले
दुबईच्या मैदानात रंगलेल्या न्यूझीलंडवर विरुद्ध रंगतदार सामन्यात भारतीय संघाने ४ विकेट्सनं विजय मिळवत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. सर्वाधिक वेळा ही स्पर्धा गाजवण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावे झालायय मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकली, पण टॉस गमावल्यानंतर मॅच जिंकण्याचा सिलसिला कायम राखत टीम इंडियाने दिमाखात बाजी मारली. टॉस हा नशीबाचा भाग आहे, पण मॅच जिंकण्यासाठी कर्तृत्व लागतं अन् ते आमच्याकडे आहे, हेच टीम इंडियाने दाखवून दिली.
ICC स्पर्धेत हवा केल्यावर याआधीही टीम इंडियानं बुर्ज खलिफावर सोडली होती छाप
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० व्रर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यावरही बुर्ज खलिफावर टीम इंडियातील शिलेदारांच्या कर्तृवाची झलक झळकल्याचे पाहायला मिळाले होते. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकलीये. तेही दुबईत मग बुर्ज खलिफावर टीम इंडियाच्या विजयाचा उत्सव तर साजरा होणारच की. तिच झलक व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.
Web Title: IND vs NZ Final Burj Khalifa Lights Up In Team Indias Colors After Champions Trophy 2025 Win Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.