India vs New Zealand : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया १५ वर्षांचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा दुष्काळ संपवेल अशी आशा होती, परंतु उपांत्य फेरीत इंग्लंडच्या दोन फलंदाजांनी संघाला धू धू धुतले. आता BCCI २०२४च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यावर रोहित, विराट कोहली व लोकेश राहुल यांना विश्रांती दिली गेली आहे, शिवाय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यांच्यासह सपोर्ट स्टाफ सदस्यांनाही विश्रांती दिली गेलीय... व्ही व्ही एस लक्ष्मण या दौऱ्यावर भारतीय संघाला मार्गदर्शन करणार आहे. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या गोष्टीवरून राहुल द्रविड व सपोर्ट स्टाफवर टीका केली आहे.
टीम इंडियाने ट्वेंटी-२०साठी नवा कर्णधार निवडायला हवा; Ravi Shastri यांचा सल्ला, दिला इंग्लंडचा दाखला
राष्ट्रीय कर्तव्यावरून द्रविडचे सतत गैरहजर असण्यावर शास्त्री नाराज झाले आहेत आणि त्यांनी शब्दरुपाने ती व्यक्त केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून १० विकेट्सने हार मानावी लागली. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० मालिका, तर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली वन डे मालिका खेळणार आहे. ''माझा ब्रेकवर विश्वास नाही. मला माझ्या संघाला व खेळाडूंना समजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर संघाचे संतुलन तयार करायचे आहे. मग सतत ब्रेक घेण्यात काय अर्थ? आयपीएल स्पर्धेदरम्यान दोन-तीन महिन्यांचा ब्रेक मिळतो, तेवढा पुरेसा आहे. अन्य वेळेस प्रशिक्षकाने संघासोबत असायला हवे,''असे शास्त्री म्हणाले.
राहुल द्रविडची विश्रांती
- १८ ऑक्टोबर २०२१मध्ये राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड
- ४९ वर्षीय माजी कर्णधार जुलै २०२२ मध्ये झालेल्या वेस्ट इंडिज व आयर्लंड दौऱ्यावर संघासोबत नव्हता
- आशिया चषक स्पर्धेतील २०२२ पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या लढतीत कोव्हिडमुळे गैरहजर
- सध्याच्या न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती
टीम इंडियाने ट्वेंटी-२०साठी नवा कर्णधार निवडायला हवा''ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये नवा कर्णधार निवडण्यात कोणताच धोका नाही, असे मला वाटते. कारण, क्रिकेटचा व्याप एवढा वाढला आहे की, एका खेळाडूला तीनही फॉरमॅटमध्ये सतत खेळत राहणे शक्य नाही. रोहित वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व करतोय. त्यामुळे ट्वेंटी-२०त नवा कर्णधार निवडण्यास काहीच अडचण नाही. जर हार्दिक पांड्याचं नाव पुढे असेल, तर त्याला करायला हवं,''असे शास्त्री म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वलमराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"