IND vs NZ : Hardik Pandya, केन विलियम्सन यांची 'crocodile bike' वरून एन्ट्री, ट्रॉफीचे अनावरण अन् बरंच काही... 

India tour to New Zealand : हार्दिक पांड्या आणि केन विलियम्सन यांनी बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात १८ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेच्या ट्रॉफीचे अनावरण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 10:01 AM2022-11-16T10:01:56+5:302022-11-16T10:06:07+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ : Hardik Pandya and Kane Williamson on a crocodile bike in Wellington, they releases India vs NewZealand T20 Series TROPHY | IND vs NZ : Hardik Pandya, केन विलियम्सन यांची 'crocodile bike' वरून एन्ट्री, ट्रॉफीचे अनावरण अन् बरंच काही... 

IND vs NZ : Hardik Pandya, केन विलियम्सन यांची 'crocodile bike' वरून एन्ट्री, ट्रॉफीचे अनावरण अन् बरंच काही... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India tour to New Zealand : हार्दिक पांड्या आणि केन विलियम्सन यांनी बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात १८ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेच्या ट्रॉफीचे अनावरण केले.  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दोन्ही संघांचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते. त्यानंतर टीम इंडियामध्ये बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २०२४ चा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन BCCI हार्दिकला भविष्याचा कर्णधार म्हणून  तयार करत आहेत आणि युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देत आहेत. त्यामुळे या मालिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आज चषकाचे अनावरण करण्यासाठी दोन्ही संघांचे कर्णधार क्रोकोडाईल बाईकमध्ये बसून आले आणि स्टेअरिंग हार्दिकच्या हाती होते.

MS Dhoniची मध्यस्थी, रवींद्र जडेजा अन् CSK चं पॅकअप; अष्टपैलू खेळाडूची ३ शब्दांची प्रतिक्रिया


भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातली पहिली ट्वेंटी-२० लढत शुक्रवारी वेलिंग्टन येथे होणार आहे. त्यानंतर २० नोव्हेंबरला माऊंट मौगानूई येथे दुसरी आणि २२ नोव्हेंबरला नेपियर येथे तिसरी लढत होईल. त्यानंतर तीन सामन्यांची वन डे मालिका होईल आणि २५ नोव्हेंबर ( इडन पार्क), २७ नोव्हेंबर ( सिडनी पार्क) व ३० नोव्हेंबर ( हँगली ओव्हल) असे सामने होतील.  


भारताचा ट्वेंटी-२० संघ - हार्दिक पांड्या ( कर्णधार), रिषभ पंत ( उप कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक.  


न्यूझीलंडचा ट्वेंटी-२० संघ -  केन विलियन्स ( कर्णधार), फिन ॲलन, मिचेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, ल्युकी फर्ग्युसन, डॅरील  मिचेल, ॲडम मिल्ने, जिमी निशॅम, ग्लेन फिलिप्स, मिचल सँटनर, इश सोढी, टीम साऊदी, ब्लेअर टिकनर. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"      

Web Title: IND vs NZ : Hardik Pandya and Kane Williamson on a crocodile bike in Wellington, they releases India vs NewZealand T20 Series TROPHY

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.