IND Vs NZ, ICC WTC Final: इंग्लंडमध्ये भारतीय संघावर कडक निर्बंध; खेळाडूंना एकमेकांना भेटण्यासही मज्जाव

IND Vs NZ, ICC WTC Final: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी भारतीय कसोटी संघाचे शिलेदार इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 03:22 PM2021-06-04T15:22:46+5:302021-06-04T15:23:34+5:30

whatsapp join usJoin us
IND Vs NZ ICC WTC Final Team India In Hard-quarantine Not Allowed To Meet Each Other | IND Vs NZ, ICC WTC Final: इंग्लंडमध्ये भारतीय संघावर कडक निर्बंध; खेळाडूंना एकमेकांना भेटण्यासही मज्जाव

IND Vs NZ, ICC WTC Final: इंग्लंडमध्ये भारतीय संघावर कडक निर्बंध; खेळाडूंना एकमेकांना भेटण्यासही मज्जाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND Vs NZ, ICC WTC Final: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी भारतीय कसोटी संघाचे शिलेदार इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत. पण इंग्लंडमध्ये पोहोचताच भारतीय खेळाडूंना कोरोना संबंधीच्या कडक निर्बंधांना सामोरं जावं लागत आहे. संपूर्ण भारतीय संघ सध्या क्वारंटाइन नियमांचं पालन करत असून यातील नियम अतिशय कठोर करण्यात आले आहेत. यात खेळाडूंना पुढील ३ दिवस एकमेकांनाही भेटण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. (IND Vs NZ, ICC WTC Final: Team India In Hard-quarantine, Not Allowed To Meet Each Other)

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतीय संघाला ब्रिटन सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यात १८ ते २३ जून दरम्यान साऊथहॅम्प्टनच्या स्टेडियमवर सामना रंगणार आहे. न्यूझीलंडचा संघ भारतीय संघाआधीच इंग्लंडमध्ये आहे. भारतीय संघाविरुद्धच्या अंतिम सामन्याआधी न्यूझीलंडचा संघ इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्यातील पहिला सामना सध्या सुरू आहे. 

भारतीय संघ इंग्लंडला दाखल झाल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. क्वारंटाइन नियमांमध्ये तीन दिवस खेळाडूंना एकमेकांनाही भेटता येणार नसल्याची माहिती भारतीय संघाचा फिरकीपटू अक्षर पटेल यानं दिली आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना होण्याआधी देखील मुंबईत १४ दिवस क्वारंटाइन होता. 

कोरोना चाचण्यांचा भडीमार
भारतीय खेळाडूंना क्वारंटाइनसोबतच त्यांच्या कोरोना चाचण्या देखील सातत्यानं घेतल्या जाणार आहेत. यात खेळाडूंना दैनंदिन पातळीवर आरोग्य तपासणीला सामोरं जावं लागणार आहे. याशिवाय बायोबबलमधून बाहेर पडण्याची कोणत्याही खेळाडूला परवानगी देण्यात येणार नाही. 
 

Web Title: IND Vs NZ ICC WTC Final Team India In Hard-quarantine Not Allowed To Meet Each Other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.