India vs New Zealand : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना २७ जानेवारी रोजी रांची येथे खेळवला जाईल. भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन ( Ishan Kishan Interview) याने पहिल्या सामन्याआधी एक मोठा खुलासा केला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये इशान किशनची मुलाखत आहे.
जसप्रीत बुमराह थेट IPL 2023 मधून मैदानावर पतणार; IND vs AUS या महत्त्वाच्या मालिकेलाही मुकणार
इशान किशनने सांगितले की,''त्याला आधी २३ नंबरची जर्सी घालायची होती, पण २३ नंबरची जर्सी कुलदीप यादवने आधीच घातली होती. म्हणून तो त्याच्या आईशी बोलला आणि आई म्हणाली की तू ३२ नंबरची जर्सी घाल, त्यानंतर कोणताही प्रश्न न करता इशानने जर्सी घालायला सुरुवात केली. झारखंडमध्ये आल्यावर त्याने वयाच्या १४ व्या वर्षीच प्रोफेशनल क्रिकेटर व्हायचे ठरवले होते. तेव्हापासून भारतासाठी क्रिकेट खेळण्याचे त्याचे स्वप्न होते, जे नंतर पूर्णही झाले.''
इशान किशनने सांगितले की, ''त्याचा क्रिकेट आयडॉल महेंद्रसिंग धोनी आहे. मी १८ वर्षांचा असताना धोनीशी पहिली भेट झाली. तेव्हा त्याने धोनीचा ऑटोग्राफही घेतला होता.तो दिवस आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण होता आणि मी तो ऑटोग्राफ आजपर्यंत जपून ठेवला आहे.'' धोनी व इशान हे दोघंही झारखंडचे आहेत. धोनी आणि इशान किशन हे दोघेही सुरुवातीला झारखंडसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले.
भारताचा ट्वेंटी-२० संघ ( वि. न्यूझीलंड) - हार्दिक पांड्या ( कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा ( यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उम्रान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार
न्यूझीलंडचा ट्वेंटी-२० संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, डेव्हन कॉनवे, जेकब डफी, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिपन, ब्लेअर टिकनर, हेन्री शिपले, ईश सोढी
पहिली ट्वेंटी-२० - २७ जानेवारी, रांची
दुसरी ट्वेंटी-२० - २९ जानेवारी, लखनौ
तिसरी ट्वेंटी-२० - १ फेब्रुवारी, अहमदाबाद
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs NZ: Ishan Kishan revealed the reason behind choosing number 32 as the jersey number, Watch Video of his Interview
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.