Join us  

IND vs NZ: रिवाबा Shocked ! रविंद्र जाडेजाने कॅच सोडताच 'मिसेस. जाडेजा'ची रिअँक्शन व्हायरल

Rivaba Jadeja reaction : जाडेजाने अतिशय सोपा झेल सोडताच सर्व फॅन्ससोबतच त्याची पत्नी रिवाबाही झाली नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 4:37 PM

Open in App

Rivaba Jadeja Reaction on Ravindra Jadeja Dropped catch, World Cup 2023 IND vs NZ Live Updates : विश्वचषक स्पर्धेत गत-उपविजेत्या न्यूझीलंडच्या संघाचा भारताशी सामना सुरू आहे. धरमशाला येथील या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी दोघांनी पहिल्या १० षटकांच्या खेळातच १-१ बळी घेतला. त्यानंतर ११व्या षटकात भारताला तिसऱ्या विकेटची संधी होती, पण चक्क रविंद्र जाडेजाने तो झेल सोडला अन् साऱ्यांनाच आश्चर्य वाटले. जाडेजाच्या पत्नीची रिअँक्शन सर्वाधिक व्हायरल झाली.

भारताने सुरूवातीला न्यूझीलंडला १९ धावांतच २ धक्के दिले. पण त्यानंतर भारतीय स्पिनर्सचा राचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल जोडीने चांगलाच समाचार घेतला. भारतीय वंशाच्या राचिन रविंद्रचा जाडेजाने सोडलेला कॅच भारताला महागात पडला अन् मग दोघांनी मिळून १५० धावांची पार्टनरशिप केली. राचिन रविंद्र १२ धावांवर खेळत होता. त्यावेळी मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर राचिनने चेंडू मारला. चेंडू अतिशय आरामात रविंद्र जाडेजाच्या दिशेने गेला. जाडेजासारख्या उत्तम फिल्डरकडून कॅच सुटेल असे कोणालाही वाटले नव्हते, पण जाडेजाने कॅच सोडला. तो कॅच घेतला असता तर राचिन १२ धावांवर माघारी परतला असता. तो झेल सोडल्यावर मिसेस जाडेजाही नाराज झाल्याचे दिसून आले.

----

मिसेस जाडेजाची रिअँक्शन व्हायरल-

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपरवींद्र जडेजान्यूझीलंडभारत