Join us  

Video: जबरदस्त! श्रेयस अय्यरने हवेत घेतला भन्नाट झेल, न्यूझीलंडचा सलामीवीर 'भोपळ्या'वरच माघारी

फटका मारताच चेंडू वेगाने श्रेयसच्या दिशेने गेला अन् त्याने उडी घेतली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 2:29 PM

Open in App

World Cup 2023 IND vs NZ Live Updates : वन डे विश्वचषक स्पर्धेतील यंदाचे 'टेबल टॉपर्स' न्यूझीलंड आणि भारत यांच्यात आज धरमशाला येथे सामना रंगला आहे. या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितचा निर्णय सिराजने सार्थ ठरवला. भारताकडून डावातील चौथे षटक टाकताना सिराजने सलामीवीर डेवॉन कॉन्वेचा काटा काढला. त्याच्या पायावर चेंडूचा सतत मारा करत असताना, त्याने धाव काढण्यासाठी एक चेंडू फटकावला. चेंडू अवघ्या काही काळ हवेत गेला, पण श्रेयस अय्यरने जबरदस्त कॅच पकडला अन् सिराजने भारताला पहिलं यश मिळवून दिलं.

पाहा श्रेयस अय्यरने टिपलेला झेल-

दरम्यान, भारताच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादव तर शार्दुल ठाकूरच्या जागी मोहम्मद शमीला संघात स्थान मिळाले आहे. न्यूझीलंडचा अनुभवी कर्णधार केन विल्यमसन आजच्या सामन्यालाही मुकला असून टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करत आहे.

भारत- रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह

न्यूझीलंड- डेवॉन कॉनवे, विल यंग, राचिन रवींद्र, टॉम लॅथम, डॅरेल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

आतापर्यंतच्या स्पर्धेत दोनही संघ अजिंक्य आहेत. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघाने आपल्या पहिल्या चार सामन्यात विजय मिळवले आहेत. दोन्ही संघांचे ८ गुण असूनही नेट रनरेटच्या बळावर न्यूझीलंड पहिल्या आणि भारत दुसऱ्या स्थानी आहे.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपश्रेयस अय्यरमोहम्मद सिराजविराट कोहलीन्यूझीलंडरोहित शर्मा