IND vs NZ: अरे देवा.. धाव घेण्यावरून गोंधळ, सूर्यकुमार रन-आऊट! हाच 'टर्निंग पॉईंट' ठरणार?

Suryakumar Yadav Run Out, Virat Kohli: विराटने धाव घेण्यास नकार दिल्याने सूर्याने दिलं 'बलिदान'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 09:29 PM2023-10-22T21:29:24+5:302023-10-22T21:29:38+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ live updates Confusion over the taking run with Virat Kohli and Suryakumar run-out can this be the turning point | IND vs NZ: अरे देवा.. धाव घेण्यावरून गोंधळ, सूर्यकुमार रन-आऊट! हाच 'टर्निंग पॉईंट' ठरणार?

IND vs NZ: अरे देवा.. धाव घेण्यावरून गोंधळ, सूर्यकुमार रन-आऊट! हाच 'टर्निंग पॉईंट' ठरणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Suryakumar Yadav Run Out Virat Kohli Video, World Cup 2023 IND vs NZ Live Updates: न्यूझीलंडने दिलेल्या २७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सुरू चांगली केली होती. रोहित शर्मा आणि शुबमन गिल दोघांनी भारताला वेगवान सुरूवात करून दिली. पण लॉकी फर्ग्युसनने त्या दोघांना माघारी पाठवले. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांना चांगली सुरूवात मिळाली, पण ते दोघे स्वस्तात बाद झाले. त्यानंतर आज पहिला वर्ल्ड कप सामना सूर्यकुमार यादव मैदानात आला. विराटच्या साथीने सुर्या डाव सावरेल असे वाटत होते, पण धाव घेण्यावरून झालेल्या गोंधळात सूर्याला आपल्या विकेटचे बलिदान द्यावे लागले.

काय घडला प्रकार?

सूर्यकुमार यादव खेळत असताना ट्रेंट बोल्टने चेंडू टाकला. चेंडू टोलवताच सूर्यकुमार धावला आणि विराटही आपल्या क्रीजमधून बाहेर निघाला. सूर्या वेगाने धावत नॉन स्ट्राईकच्या अगदी जवळ पोहोचला. पण त्याच वेळी फिल्डरने चेंडू अडवून ट्रेंट बोल्टकडे पाठवला. बोल्टने क्षणाचाही विलंब न लावता चेंडू किपरकडे फेकला. त्यावेळी सूर्या आणि विराट एकाच जागी होते. पण विराट कोहली अर्धशतक ठोकून पिचवर सेट झाला असल्याने, सूर्याने आपल्या विकेटचे बलिदान दिले. पाहा व्हिडीओ-

सूर्याने ४ चेंडूत २ धावा केल्या अन् भारताला पाचवा धक्का बसला. हा रन-आऊट सामन्यात टर्निंग पॉईंट ठरणार का? अशी चर्चा हळूहळू बोलली जात आहे.

Web Title: IND vs NZ live updates Confusion over the taking run with Virat Kohli and Suryakumar run-out can this be the turning point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.