Kuldeep Yadav Rohit Sharma Laughing Video, World Cup 2023 IND vs NZ Live: भारताविरूद्धन्यूझीलंडच्या संघाने विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत २७३ धावा केल्या. डॅरेल मिचेलचे शतक (१३०) आणि राचिन रविंद्रचे अर्धशतक (७५) यांच्या बळावर न्यूझीलंडनेभारताला २७४ धावांचे आव्हान दिले. आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या मोहम्मद शमीने पाच गडी बाद करून न्यूझीलंडला तीनशेपर्यंत मजल मारू दिली नाही. त्यासोबतच कुलदीप यादवने केलेला एक चेंडूही चर्चेत राहिला. त्याच्या त्या कृतीमुळे रोहित शर्मालाही हसू आवरलं नाही.
नक्की काय घडलं?
न्यूझीलंडविरुद्ध फिरकीपटू कुलदीप यादवने अचानक इतका वेगवान चेंडू टाकला की, फलंदाजही अवाक् झाला. चेंडूचा वेग वाचण्यात अपयशी ठरलेल्या फलंदाज डॅरिल मिचेलच्या डाव्या हातालाही चेंडू जोरात लागला. त्यानंतर आश्चर्यचकित झालेल्या फलंदाजाकडे पाहून रोहित शर्मालाही हसू आवरलं नाही. नंतर जेव्हा चेंडूचा वेग कळला तेव्हा तो तब्बल ११४ किमी प्रतितास होता. बरेचदा मध्यमगती गोलंदाज देखील यापेक्षा कमी वेगाने गोलंदाजी करतात. त्यामुळे रोहितला हसू अनावर झाले. पाहा व्हिडीओ-
-----------
दरम्यान, पहिल्या दोन विकेट्सनंतर भारताला राचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल जोडीने रडवले. १५९ धावांची भागीदारी करत त्यांनी चांगला पाया रचला. राचिन ७५ धावांवर बाद झाला पण डॅरेल मिचेलने धुलाई सुरूच ठेवली होती. त्यामुळे वैतागून कुलदीपने एक वेगवान चेंडू टाकल्याचे दिसून आले.
शेवटच्या टप्प्यात मात्र शमी आणि इतर गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत न्यूझीलंडच्या धावा अडवल्या. ग्लेन फिलिप्स (२३) वगळता सारेच एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. मिचेलने मात्र एकाकी झुंज सुरू ठेवली. त्याने ९ चौकार आणि ५ षटकारांसह १३० धावा केल्या. गोलंदाजीत मोहम्मद शमीने विल यंग, राचिन रविंद्र, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री या पाच फलंदाजांना माघारी धाडलं.
Web Title: IND vs NZ Live Updates Kuldeep Yadav rapid speed bowling to Daryl Mitchell made Rohit Sharma laughed out loud World Cup 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.